आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Crime, Police Mobiling, Divya Marathi

मामा-भाच्याने मांडला उच्छाद,दीड महिन्यात केली 14 वेळा रस्तालूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अट्टल चोर असलेल्या मामा-भाच्याने गेल्या दीड महिन्यात चक्क 14 ठिकाणी रस्तालूट करून धुमाकूळ घातला. रस्तालूट करताना त्यांनी प्रत्येकवेळी चोरीच्या मोटारसायकलीचा वापर केला. या दोघांच्या कृत्यांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. यातील भाचा अनिल कोळेकर (वय 20, रा.सुरत) याला पथकाने अटक केली आहे. तर मामा एकनाथ जाधव (वय 32, मोहाडी, धुळे) याचा ते शोध घेत आहेत.
या दोघांनी मिळून 29 जानेवारी रोजी धुळ्यातून मोटारसायकल (क्रमांक एमएच 18 एके 6055) चोरी केली. त्यांनी चोपडा, जळगाव, पारोळा, भुसावळ यासह सुरत महामार्गावर छोट्या-मोठय़ा मिळून 14 रस्तालुटी केल्याचे अटकेत असलेल्या कोळेकर याने सांगितले. अद्याप सर्व मुद्देमाल मात्र जाधवकडे असल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे पोलिस जाधवचा शोध घेत आहेत.
मोबाइलमुळे सापडले
अमळनेर रस्त्यावर माळी यांचा मोबाइल दोघांनी पळवला होता. या मोबाइलच्या लोकेशनचा शोध स्थानिक गुन्हे शाखेने सुरू केला. काही दिवसांनी उंबरखेड (ता.निफाड) येथील अजय बाळू गांगुर्डे याच्याकडे मोबाइल असल्याची माहिती मिळाली. एलसीबीचे निरीक्षक प्रभाकर रायते, सहायक निरीक्षक किरण शिंदे, उत्तमसिंग पाटील, ईश्वर सोनवणे,सुशील पाटील या पथकाने सापळा रचून उंबरखेड येथून गांगुंर्डेला तसेच त्याच्याकडून माहिती घेऊन कोळेकर याला सुरतहून ताब्यात घेतले.