आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ.सतीश पाटलांनी घेतली जैन यांची भेट; देवकर, रायसोनी, मयूर, वाणी यांच्याशीही चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ.सतीश पाटील यांनी बुधवारी धुळे न्यायालयात आमदार सुरेश जैन यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रदीप रायसोनी, राजा मयूर आणि जगन्नाथ वाणी यांच्याशीदेखील चर्चा केली. न्यायालयाच्या आवारात डॉ.पाटील हे तब्बल दोन तास आमदार जैन यांच्या संपर्कात होते.


जळगाव मतदारसंघात शहराची महत्त्वाची भूमिका आहे. तसेच जळगाव शहरात आमदार जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सत्ता असल्याने त्यांच्या मदतीचीही आवश्यकता आहे. त्यादृष्टीने आमदार जैन यांचे आशीर्वाद घेण्यासाठी डॉ.पाटील बुधवारी धुळ्यात पोहोचले. न्यायालयाच्या आवारात डॉ.पाटील यांनी त्यांच्याशी चर्चा केली. आमदार जैन यांनी आपणास आशीर्वाद दिला असूून, गुलाबराव देवकरांनीदेखील संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे डॉ.पाटील यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
देवकर जामीन; युक्तिवाद
गुलाबराव देवकर नगराध्यक्ष असताना त्यांच्या कार्यकाळात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. देवकरांवर असलेले आरोप इतरांवर आहे. त्यांना जामीन मिळाला आहे, असा युक्तिवाद देवकरांचे वकील अँड. श्रीकांत शिवदे यांनी केला. या प्रकरणी शनिवारी कामकाज होणार आहे.