आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Food And Drugs Administration, Divya Marathi

‘कॅफे मद्रास’वर दाखल होणार खटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हॉटेल कॅफे मद्रासमधील मसाला डोशातील सांबारमध्ये मेलेला उंदीर आढळून आला होता. तपासणीसाठी पाठविलेले अवशेष उंदराचे असल्याचे दुसर्‍या अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हॉटेलच्या संचालक मंडळावर खटला दाखल करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी. यू. पाटील यांनी दिले आहेत. त्यामुळे लवकरच खटला दाखल करण्यात येणार असल्याचे पालिकेचे अन्नसुरक्षा अधिकारी एस.व्ही. पांडे यांनी स्पष्ट केले आहे.

‘कॅफे मद्रास’ हॉटेलमध्ये 12 मे रोजी ‘दिव्य मराठी’चे रिपोर्टर प्रदीप राजपूत यांनी मसाला डोसा खाण्यासाठी घेतला होता. खात असताना त्यांना सांबरमध्ये मृत उंदीर आढळून आला होता. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे महापालिका हद्दीतील अन्नसुरक्षा अधिकारी एस.व्ही. पांडे यांनी हॉटेलमधून सील करण्यात आलेले सांबर व मृत उंदराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. नमुने तपासणीसाठी घेताना सांबारमधून उंदीर वेगळा काढून तो तपासणीसाठी प्लास्टिकच्या थैलीत पाठवण्यात आला तर सांबार स्वतंत्र बरणीत टाकून पाठवण्यात आले होते.

खटला दाखल करण्याचे आदेश
अन्न व औषध प्रशासनातर्फे हॉटेल कॅफे मद्रासच्या संचालकांवर नाशिक येथील सह आयुक्त तथा न्याय निर्णय अधिकारी यांच्याकडे खटला दाखल करण्याची परवानगी मिळाली आहे. अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त बी.यू. पाटील यांचे लेखी आदेश नुकतेच मिळाले आहे, असे अन्नसुरक्षा अधिकारी एस. व्ही. पांडे यांनी सांगितले.

अधिकार्‍यांना कायद्याचे अज्ञान
कायद्याचे अज्ञान असल्याने अन्नसुरक्षा अधिकार्‍यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन न घेता केलेला हलगर्जीपणा हॉटेल चालकाच्या पथ्यावर पडला आहे. सांबर आणि उंदीर एकाच बरणीत तपासणीसाठी पाठवण्यात आले असते तर सांबार अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले असते. मात्र तसे न केल्यामुळे नाशिक जिल्हा प्रयोगशाळेने 27 मे रोजी सांबर अन्नसुरक्षा आणि मानके कायद्यातील तरतुदीनुसार प्रमाणित असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर 6 जून रोजी प्लास्टिकच्या पिशवीत पाठवण्यात आलेला नमुना उंदराचा असल्याचा अहवाल पालिकेच्या अन्न व औषध प्रशासन अधिकार्‍यास प्राप्त झाला आहे.