आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Jalgaon Municipal Corporation, Divya Marathi

4 हजार बांधकामे होतील अधिकृत,महापालिकेने आवाहन करूनही प्रतिसाद नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका हद्दीतील गुंठेवारीतील (खडे प्लॉट वरील) बांधकामे नियमित करण्यासाठी नागरिकांना वारंवार मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याची स्थिती आहे. 12 वर्षांत नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याने योजना गुंडाळण्यापूर्वी शेवटचा प्रयत्न म्हणून दीड वर्ष मुदतवाढ देण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू आहेत. या प्रयत्नला यश आल्यास सुमारे 4000 भूखंडांवरील बांधकामे अधिकृत होऊन पालिकेच्या तिजोरीतही मोठी रक्कम गोळा होणार आहे.


शहरातील उच्चभ्रू कॉलन्यांलगत सन 2001 पूर्वी खडे प्लॉट पाडून काहींनी विक्री केली आहेत. हे प्लॉट खरेदी केल्यानंतर संबंधितांनी त्या जागेवर पक्की बांधकामे केलेली आहेत. महापालिका हद्दीतील या बांधकामांवर मालमत्ता कर, पाणीपट्टी व इतर सेवाशुल्क आकारणी केली जाते. मात्र, या भागात सुविधा देतांना पालिकेला अकृषक (एन.ए.) परवाना नसल्याने अडचणी येतात. शासनाच्या गुंठेवारी अधिनियमन 2001 अंतर्गत अशा वस्त्यांमधील बांधकामधारकांकडून शुल्क भरून ती बांधकामे नियमित करण्याची तरतूद आहे. जळगाव महापालिकेतर्फे या योजनेचा फायदा संबंधितानी घेण्यासाठी 12 वर्षांपासून प्रय} केले जात आहेत. योजनेसंदर्भात पुरेशी माहिती नसल्याने नागरिकांकडून याला प्रतिसाद मिळालेला नाही. 12 वर्षांत बांधकामे नियमित करण्यातून केवळ 2 कोटी 24 लाख 95 हजार रुपये प्राप्त झाले आहेत. महापालिका हद्दीतील नागरिकांना या योजनेंतर्गत सवलत हवी की नको? अशी विचारणा या संदर्भात होत आहे. त्यामुळे शेवटचा प्रय} म्हणून दीड वर्ष पुन्हा मुदतवाढ घेऊन गुंठेवारीतील सर्व बांधकामे नियमित करण्याच्या दृष्टीने हालचाली केल्या जाणार आहेत.


आर्किटेक्ट असोसिएशनची मदत
शहरातील गुंठेवारी परिसरातील बांधकामे नियमित करण्यासाठी आर्किटेक्टची आवश्यकता असते. यातून कमी मोबदला मिळत असल्याने आर्किटेक्ट हे काम करण्यास उत्सुक नसतात. यावर तोडगा काढण्यासाठी पालिका प्रशासानातर्फे आर्किटेक्ट असोसिएशनची मदत घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला जाणार आहे.

असा होणार फायदा
0 बांधकामे नियमित झाल्याने दंडात्मक करातून होते सुटका.
0 नियमित झालेल्या मालमत्तेच्या मूल्यांकनात होते वाढ.
0 खरेदी-विक्री करतेवेळी बॅँकांकडून कर्ज सुविधेचा मिळतो लाभ.

गुंठेवारीतील कॉलन्या
लक्ष्मीनगर, सम्राट कॉलनी, खेडीचा परिसर, विठोबानगर, शिवाजीनगर, जैनाबाद लगतचा परिसर, सिटी कॉलनी, पिंप्राळा दांडेकरनगर, नेरीनाका परिसर, वैकुंठधाम परिसर, रामेश्वर कॉलनी, रजा कॉलनी आदी परिसराचा गुंठेवारीमध्ये समावेश होतो.

अशा आहेत अडचणी
0 नागरिकांना कायद्याचे ज्ञान नसल्याने अंमलबजावणी होत नाही.
0 परिस्थितीमुळे एकरकमी शुल्क भरण्याची तयारी नसते.
0 अंमलबजावणीसाठी आर्किटेक्ट, अभियंते उपलब्ध होत नाहीत.