आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Jalgaon Municipal Corporation, Divya Marathi

अधिकार्‍यांना दिलेल्या लाखो रुपयांचे गौडबंगाल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आर्थिक अडचणीत असलेल्या पालिकेच्या तिजोरीतून विविध कारणांसाठी देण्यात आलेल्या अग्रीम (अँडव्हान्स)च्या रकमांचा हिशेबच दिलेला नसल्याचे समोर आले आहे. दिलेल्या रकमा खर्च केल्या किंवा नाही, याचाही उलगडा होत नसल्याचे लेखा विभागाने स्पष्ट केले आहे. अधिकार्‍यांप्रमाणे काही कर्मचार्‍यांनी गेल्या 20 वर्षांपासून अग्रीमच्या रकमा थकवल्या असून, अशा अधिकारी-कर्मचार्‍यांचे पत्तेच पालिकेला मिळून येत नसल्याची स्थिती आहे.

लेखापरीक्षण अहवालात निघालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे 20 ते 25 वर्षांपासून असलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. नगरपालिका अस्तित्वात असताना विविध विभागांमध्ये कार्यरत चार कर्मचारी व अधिकार्‍यांना अँडव्हान्स दिला होता. सन 1991मध्ये कार्यरत युवराज पाटील, 1992मध्ये कार्यरत अकबर शफी पिंजारी, एम.ए.कुलकर्णी व 1993मध्ये कार्यरत विष्णू बाविस्कर यांच्या नावे दिलेली रोख रक्कम त्यांनी कुठल्या कामासाठी खर्च केली, याचा ताळमेळ बसत नसल्याची स्थिती आहे. लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी दूर करणे आवश्यक असल्याने प्रशासनाने या प्रकरणांचा पाठपुरावा करणे सुरू केले आहे. मात्र, सध्या हे कर्मचारी राहतात कुठे? याचा थांगपत्ता नाही. या तत्कालीन कर्मचार्‍यांचे पत्ते मिळवण्यासाठी खटाटोप सुरू आहे.

व्याजासह वसुलीची तरतूद
एखाद्या अधिकारी वा कर्मचार्‍याला दिलेल्या अँडव्हान्सच्या रकमेचा हिशेब काम झाल्याबरोबर सादर करणे आवश्यक असते. मात्र, विहित मुदतीत किंवा वर्षभरात हिशेब सादर केलेला नसल्यास व्याजासह त्या रकमेची वसुली करण्याची तरतूद कायद्यात आहे. सुभाष भोर, मुख्य लेखापरीक्षक
नगरपालिका काळापासून प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरू आहे. कर्मचार्‍यांना दिल्या जाणार्‍या अग्रीमच्या किरकोळ रकमेचा तातडीने हिशेब घेतला जातो. मात्र, त्या वेळच्या बड्या अधिकार्‍यांना दिलेल्या रकमांसंदर्भात आता धावपळ सुरू झाली आहे. संबंधितांकडून व्याजासह या रकमांची वसुली झाली पाहिजे. - अनिल नाटेकर, अध्यक्ष, शहीद भगतसिंग कर्मचारी संघटना
सध्या कार्यरत : उपायुक्त, पुणे महानगरपालिका
अँडव्हान्स कालावधी : 2006 ते 2007
अँडव्हान्सची रक्कम : 1,35,700
कारण : जळगाव महापालिका पोटनिवडणूक
अनिल पवार तत्कालीन निवडणूक अधिकारी
सध्या कार्यरत : दुय्यम निबंधक, ठाणे
अँडव्हान्स कालावधी : 2004
अँडव्हान्सची रक्कम : 3,50,000
कारण : जळगाव महापालिका पोटनिवडणूक
सतीश खडके तत्कालीन निवडणूक अधिकारी
सध्या कार्यरत : मुख्याधिकारी, यावल नगर परिषद
अँडव्हान्स कालावधी : 1990 ते 1992
अँडव्हान्सची रक्कम : 26,566
कारण : जनगणना, घर बांधणे, वाहन खरेदी