आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Jalgaon Municipal Corporation Not Give Pension

पालिकेने थकवली भविष्यनिर्वाह निधीची रक्कम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात केली जाणारी भविष्यनिर्वाह निधीची रक्कम दर महिन्याला 10 तारखेच्या आत भरण्याचे शासनाचे निर्देश आहेत; मात्र पालिकेने कर्मचार्‍यांच्या पगारातून कपात होणारी भविष्यनिर्वाह निधी व अंशदानाची एकूण 1 कोटी 20 लाख 44 हजार रुपयांची रक्कम थकवली आहे.


पालिका प्रशासनातर्फे कर्मचार्‍यांच्या पगारातून ग.स.सोसायटी, परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन, भविष्यनिर्वाह निधी व विमा हप्त्याची रक्कम कपात केली जाते. ही रक्कम दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत संबंधित खात्यांमध्ये जमा करण्यात यावी, असे शासनाचे निर्देश आहेत; मात्र गेल्या चार महिन्यांची स्थिती पाहता प्रशासनाने ही रक्कम महिना-दोन महिने उशिरा जमा केली आहे. शहीद भगतसिंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर यांनी माहिती अधिकारात मागवलेल्या कागदपत्रातून ही बाब उघड झाली आहे. प्रशासनाने ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील भविष्यनिर्वाह निधीचे 96 लाख 24 हजार 830 रुपये थकवले आहेत. तसेच परिभाषित अंशदान निवृत्तिवेतनाचे सप्टेंबर महिन्यातील 11 लाख 58 हजार, तर ऑक्टोबर महिन्याचे 12 लाख 60 हजार रुपये अद्यापही भरण्यात आलेले नाहीत.


प्रशासनामुळे कर्मचार्‍यांचे नुकसान
कापलेली रक्कम प्रशासन खात्यांमध्ये जमा करत नाही. त्यामुळे यावर लागणार्‍या व्याजाचा भुर्दंड कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो. मनपाने इतर देणी अदा करण्यापूर्वी सोसायटीचे हप्ते, विमा व भविष्यनिर्वाह निधीची रक्कम संबंधित खात्यांमध्ये वर्ग करायला हवी. असे अनिल नाटेकर यांनी सांगितले.