Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Jalgaon News In Marathi, Jalgaon Zilha Parishad, Raksha Khadse, Divya Marathi

‘रावेरची उमेदवारी ज्याला मिळेल त्याला विजयी करा’

हेमंत जोशी | Mar 13, 2014, 09:57 AM IST

  • ‘रावेरची उमेदवारी ज्याला मिळेल त्याला विजयी करा’

भुसावळ - ‘कार्यकर्त्यांनो, आता कामाला लागा. पक्ष ज्याला उमेदवारी देईल, त्याला विजयी करा’, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती रक्षा खडसे यांनी बुधवारी तळवेल येथे भाजप कार्यकर्त्यांना केले.रावेर मतदारसंघासाठी भाजपतर्फे हरिभाऊ जावळे यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना ज्याला उमेदवारी मिळेल त्याला विजयी करा, असे आवाहन रक्षा खडसे यांनी का केले? असा प्रo्न उपस्थित झाला आहे. रावेरची उमेदवारी बदलली जाणार नाही, असे पक्षनेतृत्वाकडून सांगितले जात असताना अजून रावेरची उमेदवारी निश्चित झालेली नाही, असे विधानही त्यांनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीशी बोलताना केले. याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करीत होते.


तेच गाव अन् तिच जीपही
आरोग्य सभापती रक्षा खडसे आज दुपारी भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे गेल्या तेव्हा त्यांच्याकडे त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांची जुनी जीप गाडी होती. एम.एच. 19। 3303 असा तिचा क्रमांक होता. एकनाथ खडसे यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी तळवेल याच गावातून प्रचाराला सुरुवात केली होती. यासाठी तळवेलला जाताना त्यांनी हीच जीप गाडी वापरली होती. त्यामुळे तळवेल आणि ती जीपगाडी खडसेंसाठी भाग्यशाली आहे, असे म्हणतात. त्यामुळेच इतर वाहने उपलब्ध असतानाही तीच जीप घेऊन तळवेलमध्ये जाण्याचा रक्षा खडसे यांच्या कृतीचा राजकीय अर्थ लावला जातो आहे.


काय म्हणाल्या रक्षा खडसे?
बुधवारी दिवसभर रावेर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीबाबत वेगवेगळ्या बातम्या पसरत होत्या. त्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांची तळवेलमधली भेट महत्त्वाची ठरली. म्हणून त्यांच्याशी थेट संवाद साधला. त्यांची उत्तरे त्यांच्याच शब्दात.
प्रश्न: आपण आज तळवेलला बैठक घेतली का?
0भुसावळहून मुक्ताईनगरला जाताना सहजच तळवेलला भेट दिली. बैठकीचा विषयच नव्हता.
प्रश्न: तिथे आपण भाषणही केले, हे खरे आहे ?
0तिथे कार्यकर्ते असल्याने त्यांच्या आग्रहाखातर दोन शब्द बोलावे लागले. ते भाषण नव्हते.
प्रश्न: नेमके काय भाषण केले?
0विशेष नाही. रावेरची उमेदवारी अजून फायनल नाही. ज्याला पक्ष उमेदवारी देईल त्याला विजयी करायचे, असे आवाहन तेथे केले.
प्रश्न: ‘ती’ विशिष्ट जीप गाडीच का वापरली ?
0तो केवळ योगायोग आहे. तीच जीप मला वापरता आली हे माझे भाग्य असू शकते.


धुळे: उमेदवारीत बदल शक्य
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपने डॉ. सुभाष भामरे यांना दिलेली उमेदवारी बदलली जाण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. डॉ. भामरे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यामुळे शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे कमालीचे नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपने डॉ. भामरे यांच्याकडून उमेदवारी काढून घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. गुरुवारी हा बदल जाहीर होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, संभाव्य उमेदवार सुभाष देवरे बुधवारीच मुंबईकडे रवाना झाले होते. आपल्याला भाजपने उमेदवारी दिली तर आपण लगेचच भाजपत प्रवेश करू, असे त्यांनी स्पष्ष्ट संकेत दिले आहेत. डॉ. सुभाष भामरे यांनी मात्र, आपण प्रचाराला सुरुवात केली असून पक्ष आपल्यावर अन्याय करणार नाही, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Next Article

Recommended