आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Khandesh Vikas Aghadi, Nationalist Congress

खान्देश विकास आघाडीच्या 34 टक्के मतांवर मदार, राष्ट्रवादी तूट भरण्याच्या प्रयत्नात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गेल्या वर्षी झालेल्या महापालिका निवडणुकीत पराभव पत्करलेल्या भाजपा व राष्ट्रवादीच्या मतांची टक्केवारी वीसच्या आत आहे. त्यामुळेच खान्देश विकास आघाडीला मिळालेल्या 34 टक्के मतांसाठी दोन्ही पक्षांची रस्सीखेच सुरू आहे. गत लोकसभा निवडणुकीत पंचवार्षिकचा विचार केल्यास राष्ट्रवादीपेक्षा भाजपाला 23 हजार 726 मतांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीला मतांची टक्केवारी वाढवणे भाग पडणार आहे.


लोकसभा निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापू लागले आहे. रावेरचा अपवाद वगळला तर जळगाव लोकसभा मतदार संघात भाजपा आणि राष्ट्रवादीच्या पक्षीय पातळीवर अद्याप प्रचार सुरू झाला नाही. तथापि, हातात केवळ 41 दिवस शिल्लक असल्याने उमेदवारांनी मतदारांमध्ये प्रभाव असलेल्या व्यक्तींच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. विजयासाठी मतांची आघाडी मिळू शकेल, अशा जळगाव शहरावर भाजपा व राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विशेष लक्ष केंद्गीत केले आहे. कारण जळगाव शहराच्या मतदानात गेल्या पाच वर्षात सुमारे 69 हजार 672 मतांची वाढ झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला राष्ट्रवादीपेक्षा 23 हजारांची आघाडी होती; यात आता वाढलेली मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी दोन्ही उमेदवारांना मतदारांवर प्रभाव पाडावा लागणार आहे. त्यामुळे उमेदवारा कामाला लागले.


खाविआची भूमिका आठवडाभरात
गेल्या पंचवार्षिकमध्ये भाजपाच्या बाजूने उभे राहिलेल्या आमदार सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची भूमिका कोणाच्या बाजूने राहते याची प्रचंड उत्सुकता आहे. खाविआचे नेते रमेश जैन मुंबईला गेलेले असल्यामुळे ते आल्यानंतरच धोरण स्पष्ट करण्यात येणार आहे. आठवडाभरात यासंदर्भात भूमिका जाहीर होईल, असा विश्वास सभापती नितीन लढ्ढा यांनी व्यक्त केला.


मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर
महापालिका निवडणुकीत 56 टक्के मतदान झाले होते. त्यात खान्देश विकास आघाडीला सुमारे 34 टक्के, भाजपाला 21 टक्के तर राष्ट्रवादीला 17 टक्के मतदान मिळाले होते. त्यापाठोपाठ मनसेच्या बाजूने 13 टक्के मतदारांनी कौल दिला होता. अद्याप मनसेतर्फे कोणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. तर खान्देश विकास आघाडीच्या वतीने कोणाला पाठींबा दिला जातो, यावर शहरातून मिळणार्‍या मतांची आघाडी राहील.