आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव - तीन दिवसांच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या पाहणी दौर्यावर निघालेले मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण असोत की मराठवाड्यातील तीन जिल्हय़ांत फिरून आलेले केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार असोत, सार्या सत्ताधार्यांची पावलं पडताहेत ती विदर्भ आणि मराठवाड्याकडे. या दोन्ही प्रांतांइतक्याच गारपीटग्रस्त असलेल्या खान्देशकडे मात्र कोणीही फिरकायला तयार नाही. येणार्या लोकसभा निवडणुकीत अशा दौर्यांमुळे खान्देशातून काही राजकीय लाभ होण्याची शक्यता नसल्यानेच सत्ताधारी दिग्गज या हानीग्रस्त भागाशी दुजाभाव करीत आहेत, अशी शेतकर्यांची भावना झाली आहे.
खान्देशात का येत नाहीत ?
1. 55 टक्के शेती बाधित झाली तरी खान्देशातील 2.41 लाखपैकी 1.33 लाख हेक्टर, म्हणजे तब्बल 55 टक्के क्षेत्र गारपिटीने बाधित झाले आहे.
2. 05 माणसे, 298 जनावरे मृत्युमुखी खान्देशातील जळगाव व धुळे या दोनच जिल्हय़ात मिळून 5 जणांचा बळी गेला असून,298 जनावरे मृत झाली आहेत.
3. चारच खासदार, तेही ठरलेले खान्देशातून चारच खासदार निवडले जातात. त्यातले तीन भाजप तर एक काँग्रेसचा असतो. त्यात बदल संभवत नाही.
4. राजकीय ताकद नसल्याने खान्देशातील नेत्यांचा राज्यात फारसा प्रभाव नसल्याने राजकीय ताकद नाही. परिणामी, कोणी महत्त्व देत नाही.
का जात आहेत मराठवाड्यात ?
1. 25 टक्के शेती झाली बाधित मराठवाड्यातील 19 लाख हेक्टर रब्बी क्षेत्रापैकी 5.91 लाख हेक्टर क्षेत्र गारपिटीमुळे बाधित झाले आहे.
2. 15 माणसे, 451 जनावरे मृत्युमुखी मराठवाड्यातील आठ जिल्हय़ांत मिळून 15 जणांचा बळी गेला. एकूण 451 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.
3. आठ खासदार देणारा प्रांत मराठवाड्यातून राज्यातले आठ खासदार निवडून येतात. त्यातले तीनच सत्ताधार्यांकडे आहेत. त्यात वाढ होऊ शकते.
4. राजकीय ताकद असल्याने मराठवाड्याने तीन मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री दिले आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या ताकदवान नेते तिथे आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.