आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Know Your Customer, Divya Marathi

केवायसी नसल्यास दंडात्मक कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - केवायसी (नो युवर कस्टमर) सादर न केलेल्या ग्राहकांना आता दंड आकारण्याची तयारी बॅँका करीत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाने याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. ज्या ग्राहकांची 31 मार्चपर्यंत बँकेकडे केवायसी नोंदणी झालेली नसेल, त्या ग्राहकांना 1 एप्रिलपासून 112 रुपये दंड आकारण्याचे निश्चित केले.


या पाठोपाठ इतर बँकाही या प्रकारचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. रिझर्व्ह बँकेने सात वर्षापासून सुरू केलेल्या या मोहिमेला ग्राहकांचा अल्प प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे बँकांना हा कटू निर्णय घ्यावा लागल्याचे बँकांचे म्हणणे आहे. एका नावाने अनेक बँकांत असलेले खाते, त्यातून होणारी आर्थिक उलाढाल आणि बुडविला जाणारा कर आणि काळा पैसा जमविण्याचे प्रकार हुडकून काढण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांकडून केवायसी पूर्तता करून घेण्याचे आदेश बँकांना दिले होते. या आदेशाला सात वर्षे उलटून गेल्यानंतरही ग्राहकांचा म्हणावा तसा प्रतिसाद या योजनेला मिळालेला नाही. चुकीचे व्यवहार करणार्‍यांकडून हेतुपुरस्सर केवायसी नोंदविण्यासाठी टाळाटाळ होत असल्याचे बँकिंग क्षेत्राचे म्हणणे आहे.