आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Lok Sabha Election, Jalgaon, Raver, Divya Marathi

जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीकडे लोकसभा उमेदवारांनी फिरवली पाठ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - दोन्ही लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता सर्व उमेदवारांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. मात्र, या बैठकीकडे उमेदवारांनी सपशेल पाठ फिरवली. मोजकेच उमेदवार या बैठकीला उपस्थित होते.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासह निवडणुकीच्या विविध मुद्यांवर उमेदवार, पक्ष यांच्याशी समन्वय असावा म्हणून आयोगाच्या आदेशाने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी गुरुवारी दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रत्यक्ष उमेदवार येणे अपेक्षित असताना एक-दोन उमेदवारांचा अपवाद वगळता सर्वच उमेदवारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. सर्व उमेदवारांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.
प्रशासकीय बाबींसाठी वेळ देण्यास नकार
उमेदवार प्रचार यंत्रणेत सक्रीय झाले आहेत. मतदानासाठी अवघा पंधरवडा उरल्याने प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांचे प्रत्येक दिवसाचे नियोजन ठरले आहे. मध्येच प्रशासकीय बैठकीसाठी एक दिवस दिल्यास पुढचे नियोजन कोलमडेल या भीतीने अनेक उमेदवार या बैठकीला आले नाहीत. विशेष म्हणजे काही उमेदवार शहरात प्रचाराला असून देखील या बैठकीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे प्रशासनाला त्यांच्या प्रतिनिधींशीच चर्चा करावी लागली.