आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Lok Sabha Election, Social Factors, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडा: नात्यागोत्यांच्या सामाजिक गणितांवर दिला जातोय भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात मोठा वाटा असलेल्या पारोळा तालुक्याला गेल्या दोन लोकसभा निवडणुकीपासून घरचा खासदार मिळत आहे. प्रश्न इतकाच राहणार आहे यंदा कोण निवडून येणार? कारण यंदाच्या निवडणुकीत भाजपाचे ए.टी.पाटलांसमोर माजी पालक मंत्री डॉ. सतीश पाटलांचे आव्हान राहणार आहे. दोन्हीही ताकदवान उमेदवार असल्याने पक्षीय पातळीवर सुरू असलेल्या प्रचाराला आता नातेगोत्याची झालर चढायला सुरुवात झाली आहे. मराठा समाजात कोणाची ‘चलती’ राहील यावर मतदानाचा आलेख अवलंबून राहणार आहे हे नक्की!


गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ऐनवेळी भाजपाच्या तंबूत दाखल झालेले खासदार ए.टी.पाटलांनी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार वसंतराव मोरे यांचा तब्बल 96 हजार मतांनी दारुण पराभव केला होता. यंदा राष्ट्रवादीने पारोळ्यात उमेदवारी देत के वळ चेहरा बदलवत माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटलांना रिंगणात उतरवले आहे. नावाची घोषणा होताच त्यांनी दुसर्‍या दिवसापासून प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या पंचवार्षिक प्रमाणे यंदासुद्धा मराठाच आहेत. त्यामुळे मराठा समाजात सामाजिक वजन ज्याचे जास्त त्याच्याकडे समाज अधिक वळणार आहे. त्याचप्रमाणे यंदा देशात मोदी लाट निर्माण झाली असून राष्ट्रवादी त्याचा प्रभाव कसा कमी करते यावर विजयाची गणिते अवलंबून राहतील.


कोण कोणाच्या जवळचा!
दोन्ही उमेदवार पारोळा तालुक्यातील असल्याने एकमेकांचे नातलग जवळपास सारखेच आहेत. त्यामुळे नातलगांनाही मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यातही कोण कोणाच्या किती जवळचा यावर भर दिला जात आहे. सद्या तशाच पद्धतीने ग्रामीण भागात चर्चा रंगू लागल्या आहे. गेल्या निवडणुकीत एरंडोल विधानसभा निवडणुकीत भाजपाला 10 हजारांचा लिड होता. त्यामुळे डॉ. पाटील यांच्यासमोर आपल्याच घरातून मतांचे अंतर कमी करण्याचे आव्हान असेल. तसेच शिवसेना ए.टी.पाटलांसाठी किती ताकद लावते याकडेही लक्ष राहणार आहे.


आमदारांची मदत किती?
जळगाव लोकसभा मतदारसंघात चार आमदार राष्ट्रवादीचे तर एक शिवसेना व एक अपक्ष आहे. त्यात अपक्ष आमदार साहेबराव पाटील हे चार वर्षापासून राष्ट्रवादी पक्षासोबतच आहेत. विशेष म्हणजे सर्व सहा विधानसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 10 हजार ते 23 हजारांपर्यंत मताधिक्य आहे. जळगाव शहर तसेच जळगाव ग्रामीणमध्ये 23 हजार 178 मते मिळाली होती. या दोन्ही मतदार संघात राष्ट्रवादीला मतांचा फरक कमी करण्यासाठी विशेष प्रय} करावे लागणार हे निश्चित आहे. 2009 मध्ये विधानसभेपूर्वी लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यामुळे आता सतीश पाटलांसोबत राष्ट्रवादीच्या चार आमदारांची साथ राहणार आहे. प्रश्न एवढाच की ते किती काम करतात.