आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Mahayuti, Lok Sabha Election, Hailstorm, Divya Marathi

महायुतीच्या मोर्चाचे राजकीय गणित हुकले,तिन्ही पक्षांच्या नेत्यांचे वेगवेगळे सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विरोधीपक्ष म्हणून चालून आलेल्या संधीचं सोनं करण्याचे महायुतीचे राजकीय गणित हुकले. युतीतील तिन्ही पक्षांच्या पदाधिकार्‍यांचे वेगवेगळे सूर असल्याने ताळमेळ जमत नसल्याचे पदाधिकार्‍यांच्या लक्षात आले. दोन्ही उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सर्वांनी केले. परंतु त्यात फारशी तळमळ जाणवलीच नाही.
गारपिटीत झालेल्या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकरी केंद्रस्थानी ठेवून महायुतीने शनिवारी शहरात मोर्चा काढला. निवडणुका असल्याने मोर्चात किती गर्दी होते याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. प्रत्यक्षात राजकीय दृष्ट्या हा मोर्चा फोल ठरला. गर्दी जमत नसल्याने मोर्चा उशिरा काढण्यात आला. दोन वर्षांपूर्वी कापसाच्या भावासाठी काढण्यात आलेल्या मोर्चासोबत या मोर्चाची तुलना कार्यकर्त्यांकडून झाली. वैयक्तिक कार्यकर्ते घेऊन पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. लोकसभेच्या तयारीत महायुतीचा ताळमेळ बसत नसल्याचे लक्षात आल्याने पदाधिकार्‍यांनी आपापल्या पद्धतीने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
कार्यकर्त्यांचे पडद्यामागे नियोजन
महायुतीचे प्रमुख पदाधिकारी सभेत स्टेजवर बसले होते. मात्र पक्षाचे इतर पदाधिकारी स्टेजच्या पडद्यामागे राजकीय गणीते जुळविण्यासाठी चर्चा करीत होते. माजी आमदार गुरूमुख जगवाणी, डॉ.राजेंद्र फडके, सुरेश भोळे, दीपक फालक, दीपक सुर्यवंशी यासह काही पदाधिकारी पडद्यामागे थांबून होते.
खडसे-महाजन यांच्यातला दुरावा उघड
युतीच्या मोर्चात उपस्थित जळगाव मतदारसंघाचे उमेदवार ए.टी. पाटील यांनी प्रचाराची संधी येथेही सोडली नाही.
वाहतुकीचा खोळंबा
दुपारी 12.00ऐवजी मोर्चाला दोनतास उशिराने 2.00 वाजता शिवतीर्थ मैदानावरून प्रारंभ झाला. 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेला सुरुवात झाली. तर सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत स्वातंत्र्य चौक ते आकशवाणी चोैकादरम्यानचा एकतर्फी रस्ता बंद करण्यात आला होता. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती.
मोर्चाची प्रमुख वैशिष्ट्ये
0 भाजप- सेनेच्या पदाधिकार्‍यांमधील दुरावा
0 एकनाथ खडसे-गिरीश महाजनांमधील दुफळी,
0 कार्यकर्त्यांमध्ये अविश्वासाचे वातावरण,
0 खासदार हरिभाऊ जावळे यांच्या चेहर्‍यावरील चिंता.
0 शहरातील मोर्चाचा काय राजकीय लाभ होईल? हे शोधणारी खासदार ए.टी.पाटील यांची शोधक नजर.
0 एकनाथ खडसे येईपर्यंत त्यांच्या सर्मथक कार्यकर्त्यांची स्टेजच्या पडद्यामागे सुरू होती घालमेल.
0 शेतकर्‍यांच्या प्रश्नावर युतीच्या नेत्यांनी सुरात सूर मिळवण्याचा प्रयत्न केला.
0 महायुतीच्या नेत्यांमध्ये उघड अस्वस्थता जाणवत होती.