आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Marathi Actor Pushkar Shrotri

‘हसवा-फसवी’ करणारा पुष्कर बनणार ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दूरचित्रवाणी, चित्रपटात सतत हास्याचे फवारे उडविणारा प्रसिद्ध अभिनेता पुष्कर श्रोत्री प्रेक्षकांना एका वेगळ्या ढंगात लवकरच पाहायला मिळणार आहे. शांत, थंड दिसणारा, मृदुभाषी असणारा मात्र मनात वेगळाच घातक विचार बाळगणारा, असा ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’च्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी ‘रेगे’ चित्रपटात सचिन वाजे नावाचा एन्काउंटर स्पेशालिस्ट पोलिस अधिकार्‍याची भूमिका पुष्कर श्रोत्री साकारणार आहे. डॉ. राम आपटे प्रतिष्ठानच्या पुरस्कार सोहळ्यासाठी पुष्कर शुक्रवारी शहरात आला होता. या वेळी पुष्करने ‘दिव्य मराठी’शी दिलखुलास गप्पा मारल्या. यात त्यांनी अनेक गोड गुपीत सांगितले.


सत्य घटनांवर प्रकाश टाकणारा, खबर्‍या दाखविणारा, पोलिसांचे जाळ्यांचे वर्णन, न्यायाधीशाचे मन वळविणे, प्रकरणे मिटवणे, यासारख्या गोष्टी करणारे हे पात्र आहे. त्याचप्रमाणे दिग्दर्शनातही लवकरच पाऊल टाकत आहे. खूप वेगळ्या कथेला हात घालीत सामाजिक समस्येशी जुळलेल्या कथेचे दिग्दर्शनही करणार आहे.


दु:खी असताना पु.लं.चे साहित्य वाचतो
माझ्यावर पु.लं.देशपांडे यांचे संस्कार आहेत. मला ते वाचायला, पाहायला, ऐकायला आवडतात. मी कंटाळलेला असेन, दु:खी असेल, गाडी चालवित असेल तर मी त्यांना ऐकतो. त्यांच्यासारखा माझा स्वभाव असल्याचे अनेक जण मला म्हणतात. मला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गोष्टीत काहीतरी वेगळेच दिसते. मुंबईत नेहमी काहीतरी काम असतेच. वर्षातून दोन वेळा कुटुंबासोबत बाहेर फिरायला जातो.

भारतातील एकमेव वाद्यवृंदाची निर्मिती
संगीताची आवड असल्याने ‘द म्युझिशियन्स’ नावाची भारतातील पहिली मराठी वाद्यवृंदाची निर्मिती केली आहे. यात अनेक वाद्यांद्वारे मराठी, हिंदी गीते वाजवली जातात. अनेकदा फक्त गीतकार, संगीतकारांना र्शद्धांजली वाहण्यासाठी कार्यक्रमांमध्ये प्रसिद्ध काही गाण्यांचे वादन केले जाते. मात्र, पूर्णपणे वादकांना सर्मपित हा कार्यक्रम आहे.