आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन: ब्रेल लिपीतून कवी कुसुमाग्रजांना श्रद्धांजली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - ‘परभाषेतही व्हा पारंगत
ज्ञानसाधना करा, तरी..
माय मराठी मरते इकडे परकीचे
पद चेपू नको..’
कवी कुसुमाग्रजांनी वरील ओळीतून मराठमोळय़ा जनतेला केलेल्या आवाहनामुळे मराठी भाषेचा झेंडा अटकेपार रोवला गेलाय. परंतु काही ठिकाणी मराठी भाषा बोलण्यापुरतीही समृद्ध नाही, याचा विचार केलाय. राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळेतील विशेष शिक्षक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी अंध विद्यार्थ्यांची मराठी भाषेवर पकड निर्माण होऊन त्यांना मराठी साहित्याची ओळख करण्याच्या उद्देशाने अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतून तात्यासाहेब तथा वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या कविता साकारल्या आहेत. अंध विद्यार्थ्यांना जगण्यासाठी एक नवी प्रेरणा, उमेद, आत्मविश्वास, बळ नक्कीच देतील, असा आत्मविश्वास सचिन सोनवणे यांनी व्यक्त केला. त्यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी या पूर्वीदेखील विविध उपक्रम हाती घेऊन आदश्र निर्माण केला आहे.


आज होणार वाचन
मराठी भाषा दिनानिमित्त अंध शाळेत ब्रेल लिपितून साकारलेल्या कवितांचे भाषांतर अंधशाळेत करण्यात येऊन कवी कुसुमाग्रजांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या ‘विशाखा’ व ‘प्रवासी पक्षी’ या कविता संग्रहातील कणा, जालियानवाला बाग, अखेर, कमाई, याचक, मौन, सातवा, सहानुभूती, पाचोळा या कविता अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतून साकारल्या आहेत. मुख्याध्यापिका प्रभा मेश्राम तसेच शिक्षकवृंदांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. सामाजिक जाणीव करून देणार्‍या कविता तात्यासाहेबांनी लिहिल्या होत्या.

ज्ञानदानाचा आनंद ..
कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी तसेच जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून या कविता अंध बांधवांना ब्रेल लिपित साकारून वाचावयास देत आहे म्हणून खूप आनंद होतो. शिक्षकीपेशाबद्दल निष्ठा राखून प्रामाणिकपणे ज्ञानदान करण्याचा आनंद काही औरच असतो. अंध विद्यार्थी मराठी साहित्याविषयी खूप अज्ञान आहे. त्यांना नवी दिशा मिळू शकेल. सचिन सोनवणे, शिक्षक.