आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Nagpur Railway Truck, Divya Marathi

अपघाताच्या 15 तासांनंतर नागपूर रेल्वेमार्ग झाला सुरळीत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - बोदवड रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचे सहा डबे रुळांवरून घसरल्याने नागपूर मार्गावरील बंद झालेली वाहतूक सोमवारी पहाटे 3 वाजता पूर्ववत झाली. रेल्वे कर्मचार्‍यांनी तब्बल 15 तास युद्धपातळीवर काम करून रुळांवर पडलेले सहा डबे बाजूला केले.


बोदवड रेल्वे स्थानकाजवळ रविवारी सकाळी 10 वाजता एन भोईसर नावाच्या मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले होते. या मुळे रेल्वे रूळ तुटून अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तर अपघाताचे वृत्त समजताच डीआरएम महेशकुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी तळ ठोकून मदतकार्याला सुरुवात केली. रात्री 2.30 वाजता काम पूर्ण झाले. त्यानंतर अत्यंत कमी वेगात गाड्या रुळावरून सोडण्यात आल्या. सोमवारी पहाटे 3 वाजता दोन्ही मार्गावरील गाड्यांची वाहतूक सुरळीत झाली. या मुळे प्रवास खोळंबलेल्या प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला.


चौकशी समिती नियुक्त
मालगाडी घसरून झालेल्या अपघात प्रकरणाची उच्च्स्तरीय चौकशी होणार आहे. यासाठी डीआरएम गुप्ता यांनी तीन वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी समिती नियुक्ती केली. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी हरिराम यांचा समावेश असलेल्या समितीने सोमवारपासून चौकशीला सुरुवात केली.

अधिकार्‍यांना सूचना
रेल्वे लाइनची दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून होते. सोमवारी सकाळी डीआरएम महेशकुमार गुप्ता यांनी पुन्हा बोदवड गाठून दुरुस्ती कार्याची माहिती घेतली. वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईपर्यंत अधिकार्‍यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या.