आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Need Research For Changdev Temple

चांगदेव मंदिराची श्रीमंती वाढवण्यासाठी हवे संशोधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - चांगदेव (ता.मुक्ताईनगर) येथील शिवमंदिर, श्रीगणेश आणि अन्य देवतांच्या मूर्ती यासारख्या वस्तुनिष्ठ पुराव्यांवर संशोधन झाल्यास सूर्यमंदिर नावाने प्रचलित या अनमोल ऐतिहासिक ठेव्याची श्रीमंती जगासमोर येईल. तापी-पूर्णा नदीच्या संगमावर भव्य आकाराचे हेमाडपंथी मंदिर आहे. भल्या मोठय़ा दगडी जोत्यावर सुंदर नक्षीकाम, निसर्ग आणि धार्मिकतेचा अनोखा मिलाप असलेल्या या स्थळाची ओळख योगीराज चांगदेव यांचे मंदिर अशी आहे. मंदिर परिसरात सन 2008 पासून भारतीय पुरातत्त्व विभागाकडून उत्खनन सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या उत्खननात मुख्य मंदिराच्या मागील बाजूने पश्चिम आणि दक्षिणेच्यामध्ये भग्नावस्थेतील मंदिराचा चौथरा सापडला आहे. पायर्‍या उतरून जावे लागणारे खोल गर्भगृह, कवेतही मावणार नाही एवढय़ा मोठय़ा आकाराचे शिवलिंग येथे आढळते. या रचनेला लागून (उत्तर दिशेने) आणि मुख्य मंदिराच्या अगदी मागे पुन्हा दोन लहान मंदिरांचे चौथरे आहेत. याच परिसरात गणपती व पार्वती यांच्या सुरेख मूर्ती सापडल्या होत्या.


* मंदिर परिसरात 2008पासून होतेय भारतीय पुरातन विभागाकडून उत्खनन


पहिले किरण मूर्तीवर
चांगदेवमधील मंदिर अडीच हजार वर्षे जुने असून सूर्यमंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आणि विष्णू मंदिर या नावांनी प्रचलित आहे. योगीराज चांगदेवांनी येथे तपश्चर्या करून वटेश्वराची स्थापना करून महाशिवरात्रीचा उत्सव सुरू केला. उत्तरायण असो वा दक्षिणायण सूर्याचे पहिले किरण मंदिरातील गरुड आणि स्वयंभू मूर्तीवरच पडतात. विष्णू गुरव, पुजारी, चांगदेव मंदिर


संवर्धनावर भर
चांगदेवमधील पुरातन ठेवा जतन करण्याची आमच्यावर जबाबदारी आहे. सध्या उत्खननासोबतच मंदिराच्या संवर्धनाची कामे सुरू आहेत. रासायनिक प्रक्रिया करून कोरीव कामाची झीज टाळणे, तुटलेल्या नक्षीकामाची दुरुस्ती कारागिरांमार्फत सुरू आहे. पी. जी. देशमुख, अभियंता, पुरातत्त्व विभाग, औरंगाबाद सर्कल