आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Now Protection For Doctors

दिव्य मराठी विशेष: डॉक्टरांविरुद्धची तक्रार खोटी ठरल्यास होणार दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नवीन वैद्यकीय कायद्यात आता डॉक्टरांना संरक्षण देण्यात आले आहे. डॉक्टरांविरुद्ध करण्यात आलेली तक्रार खोटी ठरल्यास तक्रारदारावरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. या कायद्याचा आराखडा तयार झाला असून तो जिल्हा आयएमएला पाठवला आहे.


महाराष्ट्र वैद्यकीय परिषद व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अँक्ट’ तयार करण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा देणार्‍या सर्व प्रतिष्ठांना हा कायदा लागू आहे. कायद्यात डॉक्टरांविरुद्ध तक्रार करण्याचा ग्राहकांचा हक्क अबाधित आहे. मात्र चौकशीअंती तक्रार खोटी आढळल्यास दंडात्मक कारवाईची तरतूद या कायद्यात आहे.कायद्यात हॉस्पिटल, मॅटर्निटी होम, डिस्पेन्सरी, क्लिनीक, सॅनोटेरियम, वेलनेस क्लिनीक, डे-केअर सेंटर तसेच ज्यात आजारांना प्रतिबंध घालतात अशा संस्था, कृत्रिम अवयव तयार करणारे, घरी प्रसूती करणार्‍या दायी, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, एक्स-रे, जेनरिक क्लिनीक यांचादेखील समावेश असेल.


याचा आहे अंतर्भाव
0 हॉस्पिटलात कोणत्याही आजारासंदर्भात रुग्णास प्राथमिक उपचार बंधनकारक.
0 दारिद्रय रेषेखालील रुग्णांवर अत्यावश्यक परिस्थितीत उपचार केल्यास खर्च सरकार देणार
0 कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्य समिती असणार
0 हॉस्पिटलमधील सेवांसंदर्भात माहिती एकत्रित करून संशोधनाचा प्रय}
0 रुग्णांच्या आरोग्यास बाधा पोहचेल, अशा हॉस्पिटलची नोंदणी रद्द होईल.
0 हॉस्पिटलमध्ये दरपत्रक व सेवा जाहीर करावी लागेल.
0 हॉस्पिटलची नोंदणी पाच वर्षांपर्यंत असेल
0चौकशीत दोषी आढळल्यास डॉक्टरांवर 10 ते 50 हजारांपर्यंत दंडात्मक कारवाई


तक्रार निवारण समिती
तक्रार निवारणासाठी मनपा आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समित्या असतील. यात मुख्य वैद्यकीय अधिकारी अथवा जिल्हा शल्यचिकित्सक, आयएमए प्रतिनिधी यांचा समावेश असेल. महापालिका क्षेत्रात मुख्य वैद्यकीय अधिकारी, नगरपालिका क्षेत्रासाठी जिल्हा शल्यचिकित्सक तर ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आरोग्याधिकारी समितीचे प्रमुख असणार आहे.


शनिवारी बैठक
‘क्लिनिकल इस्टॅब्लिशमेंट अँक्ट’ कायद्याचा आराखडा जळगाव आयएमएला मिळाला आहे. या कायद्यावर चर्चा करण्यासाठी शनिवारी आयएमएची बैठक आयोजित केली आहे. डॉ.अनिल पाटील, सचिव, आयएमए