आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Raver Loksabha Constituncy

रावेर लोकसभा मतदारसंघासाठी आमदार जैन यांचे नाव निश्चित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमदार मनीष जैन यांनाच उमेदवार जाहीर केली जाणार असल्याचा निरोप पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यातर्फे सोमवारी आमदार मनीष जैन यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.


गेल्या आठवड्यात जळगावात आलेल्या केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दोन्ही जागा राष्ट्रवादी लढणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर रावेरमधून आमदार मनीष जैन यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. रावेर मतदार संघातून आपल्यालाच उमेदवारी मिळेल असे आमदार जैन सांगत होते. परंतु माध्यमांमधून व पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून माजी मंत्री अरुण गुजराथी व अँड. रवींद्र पाटील यांचेच नाव पुढे येत होते. त्यामुळे आमदार जैन यांच्यापासून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीसंदर्भात संभ्रम होता; हा संभ्रम सोमवारी खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दूर केला. रावेरमधून आमदार मनीष जैन यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेत असल्याचा निरोप त्याच्याकडून जळगावात पोहोचवण्यात आला. जैन यांनी कामाला लागावे, अशी सूचना केल्याचे कार्यकर्त्यांमार्फत सांगितले जात आहे. लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्यासंदर्भात आमदार जैन यांच्याकडून पक्षाने अर्ज देखील मागवून घेतल्याचे तसेच मनीष जैन यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. लोकसभेच्या प्रचारासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार पुढच्या आठवड्यात मुक्ताईनगर येथे आयोजित मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचेही सांगितले जात आहे.