आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, School Of Health Sciences Starts At Jalgaon University

उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठात सुरू होणार ‘स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात 2014पासून ‘स्कूल ऑफ हेल्थ सायन्सेस’ हा नवीन विभाग सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शासनाची मंजुरी घेण्याचे काम सध्या सुरू आहे. विभाग सुरू करण्यासाठी लागणार्‍या खर्चाची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अशी माहिती उमविचे कुलगुरू प्रा.डॉ. सुधीर मेश्राम यांनी दिली. ते गुरुवारी ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली, ती त्यांच्याच शब्दात..
0 मुंबईच्या राजीव गांधी रिसर्च परिषदेशी उमविचा सामंजस्य करार लवकरच होत आहे. या अंतर्गत वर्षाकाठी 60 लाख रुपयांची मदत विद्यापीठाला होणार आहे. तिन्ही जिल्ह्यातील महाविद्यालयांनी संशोधनासाठी पाठवलेल्या प्रस्तावांसाठी ही रक्कम खर्च केली जाणार आहे.
0 येणार्‍या काळात विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून शिक्षण पद्धतीत बदल घडवून आणण्यात येणार आहे. ‘इकॉनॉमी बेस्ड एज्युकेशन’ची (अर्थशास्त्रीय आधारभूत शिक्षण) संकल्पना अंमलात आणली जाणार आहे. यात विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना चालना देण्याचे प्रयोजन सुरू आहे. जेणेकरून विद्यापीठातून पदवी घेऊन बाहेर पडणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार उपलब्ध होऊ शकेल.
0 कर्मचारी कल्याण योजनेचा देखील विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. वर्ग- 3 व 4च्या कर्मचार्‍यांसाठी तयार करण्यात येत असलेली निवासस्थाने डिसेंबरपर्यंत पूर्णत्वास येणार आहेत. त्यांना देण्यात येणार्‍या कर्जाची पत वाढवण्यात आली आहे.
0 इतर व्यावसायिक शिक्षणासोबतच मराठी, हिन्दी, सामाजिक शास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान या विषयांचे मूल्य जोपासण्याचा विद्यापीठाचा प्रय} आहे. त्यासाठी ‘चॉइस बेस्ड क्रेडिट सिस्टम’ संकल्पना राबवण्यात येणार आहे.
0 विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी नुकत्याच झालेल्या ‘आविष्कार’ स्पध्रेतील विविध गटात पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावणार्‍या विद्यार्थ्यांना प्रति महिना 3 ते 5 हजार रुपये मानधन दिले जात आहे.
0 संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना औद्यागिक क्षेत्राशी जोडण्यासाठी विविध कंपन्यांशी विद्यार्थ्यांचा संवाद कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ‘लॅब टू इंडस्ट्री’ हा उपक्रमही सुरू आहे. येणार्‍या काळात यात विशेष काम केले जाणार आहे.
0 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षणपद्धतीत बदल करण्याचे, व्यावसायिक अभ्यासक्रमांना चालना देण्यासाठी काम सुरू आहे. मात्र, यात केवळ व्यवस्थापन परिषदेचे सदस्यच नव्हे तर जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थाचालकांची मते देखील मागविण्यात आली आहेत. सर्वांच्या मतानुसार योग्य तो बदल करण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सध्या कामकाज सुरू करण्यात आले आहे.