आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Secondary Teachers, Divya Marathi

नोकरभरतीचा मुद्दा: जळगावात शिक्षकांच्या सभेत तुंबळ हाणामारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - येथील ग.स.सोसायटीच्या सभेचाही "रेकॉर्ड' मोडणारा गोंधळ माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या सभेत रविवारी झाला. यात नोकरभरतीच्या विषयावरून गालबोट लागले आणि विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देणाऱ्या शिक्षकांमधील चर्चा ही मुद्द्यांवरून गुद्द्यांवर जाऊन पाेहोचली. धक्काबुक्की व शिव्यांच्या लाखाेल्या वाहत प्रचंड हाणामारीत सभा गुंडाळण्यात आली. यात गुंडांमार्फत मारहाण करून आवाज दाबल्याचा आराेपही करण्यात आला.

जळगाव िजल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नाेकरांची नागरी सहकारी पतपेढीची सर्वसाधारण सभा रविवारी झाली. सभेचे अध्यक्ष तथा संस्थाध्यक्ष संभाजी पाटील यांनी सभा शांततेत पार पाडण्याचे आवाहन करत संस्थेच्या कारभाराविषयी मािहती दिली. सहकार िवभागाने माध्यमिक शिक्षक पतपेढीची िनवडणूक पद्धत कायम ठेवल्याचे सांगितले तसेच आगामी अध्यक्ष, सेक्रेटरी, ३ मागासवर्गीय सदस्य व २ महिला सदस्यांची िनवडही जनरल सभेतून हाेईल व २१ जणांची िनवड करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, यावर काही सदस्यांचे समाधान झाले नाही.

गोलमाल उत्तरांवरून वाद
सभासद शुद्धधन साेनवणे यांनी नाेकरभरतीला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली का, असा प्रश्न केला. तर एस.डी.भिरुड यांनी नाेकरभरतीसाठी पहिल्यांदा काढलेली जाहिरात का रद्द करावी लागली तसेच पुन्हा भरती प्रक्रिया राबवण्याची गरज का पडली? दरम्यान, या नाेकरभरतीत प्रत्येकी दीड लाख रुपये वाटून घेतल्याचा आराेप केला. त्यावर अध्यक्ष संभाजी पाटील यांनी उत्तर देण्यास सुरुवात केली, परंतु ते गोलमाल उत्तर असल्याचा आराेप सभासद जे. पी. सपकाळे यांनी केला. ते बाेलण्यासाठी उभे राहताच अन्य सभासदांनी त्यांना "खाली बसा' असे सांगत बाेलण्यास िवराेध केला. एकाने तर त्यांना मारण्यासाठी हात उगारला आणि ितथूनच वादाला सुरुवात झाली.

शिक्षकी पेशाला काळिमा फासला
एका मुख्याध्यापकांवर हात उगारल्यामुळे काही शिक्षक संतापले. त्यांचे समर्थकही आक्रमक झाले आणि सर्वत्र गोंधळ उडाला. या वेळी सभासदांमध्ये जाेरदार हाणामारी, धक्काबुक्की हाेऊन पळापळ सुरू झाली. या वेळी मद्यप्राशन करून काही सभासद आल्याने त्यांनीही वादाला हातभार लावून प्रचंड धिंगाणा घातला.सभासदांच्या तोंडून शिवराळ भाषा एेकल्यावर शिक्षकीपेशाला अक्षरश: काळिमा फासल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

सर्व िवषय आवाजी मतदानाने मंजूर
झालेला गांेंधळ िमटण्याची शक्यता लक्षात घेऊन पदाधिकाऱ्यांनी व सभासदांनी आवाजी मतदानाने सर्व िवषय मंजूर केले. या वेळी एकाही िवषयावर चर्चा हाेऊ शकली नाही. सभागृहातील तणाव पाहता ग.स.च्या पदाधिकाऱ्यांप्रमाणेच माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या पदाधिकाऱ्यांना सभागृहातून िनघून जावे लागले.