आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Security, CCTV Camera, Door Lock, Divya Marathi

कुलूप तोडण्याचा प्रयत्न केल्यास वाजणार अलार्म

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डीआयवाय सर्वेलिएन्स किट - Divya Marathi
डीआयवाय सर्वेलिएन्स किट

गणेश सुरसे - चो-या, घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. घटना घडण्यापूर्वीच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण प्रॉपर्टीचे रक्षण करू शकतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सीसीटीव्ही, डोअर लॉक उपयोगात आणले जाऊ शकतात. सध्या जळगावातही अशा प्रकारचे साहित्य उपलब्ध झाले आहे. ते 6 ते 30 हजार रुपयांपर्यंत मिळत आहे, अशी माहिती स्वामिदीप सोलर एनर्जी अ‍ॅण्ड एंटरप्रायजेसचे राम भावसार यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

डीआयवाय सर्वेलिएन्स किट
नव्यानेच बाजारात सीसीटीव्ही तंत्रज्ञान आलेले आहे. विशेष म्हणजे यात ग्राहकांना 2 लाख 40 हजार रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. 15 हजार रुपयात हे किट उपलब्ध आहे.
फायदे : शॉर्ट सर्किटमध्ये सीसीटीव्ही जळाल्यास किंवा घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी झाल्यास कंपनीकडून 1 लाखांचा विमा संरक्षण दिले जाते. या शिवाय जर चोरीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेराने काम करणे बंद केले तर ‘वुई फेल, वुई पे’ या तत्त्वानुसार 40 हजार रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.


आयपी कॅमेरा
सीसीटीव्हीच्या प्रकारातील हे तंत्रज्ञान आहे. दुकान, घर, ऑफिसमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीला इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या अ‍ॅण्ड्रॉइड फोनवर अ‍ॅक्सेस करता येते. 10 ते 20 हजार रुपये किंमत आहे.
फायदे : दुकान, घराबाहेर असतानाही सीसीटीव्हीचे फुटेज आवाजासह मोबाइलमध्ये दिसतात. तसेच आवाजाच्या माध्यमातून संवादही साधता येतो. मोबाइलहून रात्रीची ठरावीक वेळ दिल्यानंतर या वेळेत कॅमेराच्या समोर हालचाल झाल्यास अलार्म वाजतो.


पुढे वाचा अ‍ॅक्सेस कंट्रोल सिस्टिमविषयी.....