आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Security For Users Of Social Media

सोशल मीडियातील अफवा तापदायी,तपासात येताहेत अडचणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - अँड्रॉइड फोनमुळे सोशल मीडियाचा वापर अधिक प्रमाणात वाढला आहे. फेसबुकनंतर आता तरुणाई व्हॉट्सअँपमध्ये गुंतली आहे; मात्र हे अँप्लिकेशन वापरताना अनेक जणांकडून अफवा, बदनामीकारक व ईमेल स्वरूपाचा मजकूर व खोटी माहिती सहज अपलोड केली जात आहे. त्यामुळे अनेकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस प्रशासन याबाबत सज्ज असले तरी, तक्रारीच नसल्यामुळे त्यांना पुढे तपास करण्यात अडचणी येत आहेत.


जळगाव शहरात आतापर्यंत सायबर क्राइमचे दोनच गुन्हे दाखल झाले आहेत; मात्र दैनंदिन घडामोडीत अनेक पालक या प्रकारच्या तोंडी तक्रारी करून आपल्या पाल्यांच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसांकडे धाव घेत आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या सायबर क्राइम विभागात महिन्याकाठी पाच ते सहा तोंडी तक्रारी दाखल होतात. पाल्यांची विशेषत: मुलींची बदनामी होऊ नये म्हणून पालक या प्रकारचा गुन्हा दाखल करीत नाहीत; मात्र त्यांच्या तोंडी तक्रारीवरूनही संबंधितांची चौकशी केली जाते. त्यानंतर मात्र पीडितांना आपला मोबाइल क्रमांक व फेसबुक अकाउंट बंद करावे लागते.


व्हॉट्सअँपवर अफवांच्या बातम्या
एकमेकांशी अगदी सहज ‘अँक्सेस’ होणार्‍या ‘व्हॉट्सअँप’ या अँप्लिकेशनने सध्या तरुणाईला भुरळ घातली आहे; मात्र एकमेकांशी संवाद साधण्यासह या अँपवर अफवांच्या बातम्या पसरवण्याचे अयोग्य काम सध्या जोरात सुरू आहे. कोणत्याही अफवेची शहानिशा न करता आपल्या मोबाइलमध्ये आलेला मॅसेज किंवा फोटो काही सेकंदातच अनेक जणांच्या ग्रुपला पाठवितात. यावर नियंत्रण नसल्यामुळे हा प्रकार धोकादायक ठरत आहे.


केस 1
अपघाताचे फोटो : तीन दिवसांपूर्वी दुचाकी अपघाताचे दोन फोटो व्हॉट्सअँपवर झळकले. हा अपघात खोटेनगरातील युवकाचा असल्याचे त्यात नमूद केले होते. दुचाकी आणि मृताचा चेहरा छिन्नविछिन्न असल्यामुळे ओळख पटत नव्हती. संध्याकाळी शहरात अपघात झाला नसल्याचे निष्पन्न झाले.
केस 2
माधुरी दीक्षितचा मृत्यू : मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या एका अपघातात सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षितचा अपघात झाला. या घटनेत तिचा मृत्यू झाला, अशी अफवा सोमवारी दुपारी 12 वाजता व्हॉट्सअँपवर झळकली. पाहता-पाहता दिवसभर हा मॅसेज शेअर झाला. त्यामुळे अनेकांनी दैनिकांच्या कार्यालयात फोन करून बातमी खरी आहे की खोटी, याची खात्री करून घेतली.
केस 3
पेट्रोल स्वस्त : 29 फेब्रुवारीपासून पेट्रोलचे दर 45 रुपये प्रतिलिटर होतील, असे सर्वोच्च् न्यायालयाचे आदेश असल्याचे मॅसेज फेब्रुवारी महिन्यात दोन-तीन वेळा आले. या मॅसेजमध्ये सर्वोच्च् न्यायालयाचा हवाला देण्यात आला. एक प्रकारे न्यायालयाचा अवमानच या मॅसेजमधून झाला. हा प्रकार देखील गंभीर आहे.


सायबर क्राइम विभागाकडे येणार्‍या तक्रारींचा निपटारा तत्काळ करण्यात येतो; मात्र पालक किंवा पीडित या प्रकारचा गुन्हा दाखल करीत नाहीत. तथापि, कायदेशीर बाबी तपासून यासंदर्भात अधिक काम करता येईल. प्रभाकर रायते, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग

पुढे वाचा कसा केला जातोय सोशल मीडियाचा दुरूपयोग आणि त्यावरील उपाय......