आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Subhash Devare, Rohidas Patil, Lok Sabh Election

खासदारकीसाठी दाजींचं ऐकावं की व्याह्यांचं !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोहिदास पाटील, सुभाष देवरे आणि सी.आर. पाटील - Divya Marathi
रोहिदास पाटील, सुभाष देवरे आणि सी.आर. पाटील
धुळे - घरचं झालं थोडं अन् व्याह्यानं धाडलं घोडं, अशी अवस्था महाफेडचे माजी चेअरमन सुभाष देवरे यांची झाली आहे. दाजी रोहिदास पाटलांनी जवाहर गटाच्या माध्यमातून काँग्रेसची जहागिरी उभी केली. त्याचा पुरेपूर लाभ सुभाष देवरेंनी आतापर्यंत घेतलाही. मात्र, मुलाचा विवाह सुरतेत झाला आणि सुरतेची स्वारीच देवरेंना महत्वपूर्ण वाटू लागली आहे.
गतवेळी विधानसभेत रोहिदास पाटील यांना पराभवाचा झटका सहन करावा लागला. त्यानंतर देवरे यांचेही वर्चस्व संपुष्टात यायला लागले. अखेर देवरेंनी स्वतंत्र सवतासुभा मांडण्याचा प्रयत्न चालविला. त्यांच्या या प्रयत्नांना दुसरीकडे त्यांच्या खासदार असलेल्या व्याह्यांची साथ मिळत गेली. खासदार असलेल्या सी. आर. पाटील यांना एकसाथ दोन खासदार नरेंद्र मोदींसमोर उभे करण्याची घाई झाली. त्यातूनच सुभाष देवरे यांना जातीचे समीकरण मांडायला लावले. या समीकरणाचा योग्य निष्कर्ष काढला तर सुभाष देवरे सहज बाजी मारतात, असे चित्र उभे करण्यात आले. त्यातून भाजपचे तिकीट देण्या-घेण्याच्या गोष्टी झाल्या. त्यानंतर भाजपशी कुठलीही जवळीक नसताना सुभाष देवरे भाजपच्या वाटेकडे चालायला लागले ; पण ही वाट खडतर आहे, याची जाणीव त्यांना कोणी दिलीच नव्हती. भाजपने प्रारंभी आमच्यात या. प्रवेश घ्या. मग तिकिटाचे बोलू ही भूमिका घेतली. तीच भूमिका अद्यापही कायम आहे. मात्र, सुभाष देवरेंचे भाजपच्या वाटेकडे डोळे लावून बसण्याचे थांबलेले नाही.
गत वेळचीच चाल चालली..
गेल्या लोकसभा निवडणुकीत आमदार अमरिश पटेल यांना उमेदवारी मिळाल्यानंतर रास्ता रोको आणि यासारखी इतर आंदोलने करण्यात सुभाष देवरे पुढे होते. त्यांच्याच खांद्यावर आंदोलनाची बंदूक ठेवण्यात आली होती. मात्र, पटेल यांना तिकीट मिळाल्यानंतर संतप्त झालेल्या जवाहर गटाने मतांचे फेरपालट करीत भाजपाच्या प्रताप सोनवणे यांच्या पारड्यात मते टाकली होती. त्यामुळे धुळे ग्रामीणमध्ये पटेल यांना कमी मते मिळून ते पराभूत झाले. हेच पाहून यंदाही मतांची फेरपालट केली तर आपणच निवडून येऊ, असा देवरे यांचा होरा आहे. त्या दिशेनेच त्यांचे पाऊल भाजपाकडे वळले आहे. पण दाजी रोहिदास पाटील मात्र सध्या तरी थांबले आहेत.
जवाहर गट निष्प्रभ करण्याच्या प्रयत्नाला यश
पाच वर्षांत जवाहर गटाला बर्‍याच समस्यांना सामोरे जावे लागले. लोकसभेत पराभूत केल्याचा वचपा अमरिश पटेल यांनी विधानसभेत रोहिदास पाटलांना पाडून काढला. त्यानंतर जवाहर सूतगिरणीच्या निवडणुकीत विरोधकांनी नाकात दम आणला होता. स्व. नामदेवराव पाटील यांनी संबंधित गटाने किती सहकारी संस्था काढल्या आणि किती सुरळीत आहेत, याची यादीच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापर्यंत पोहोचविल्या. त्यानंतर राज्याच्या राजकारणातूनही जवाहर गटाचा पत्ता आपोआप कापला गेला. विधानपरिषदेसाठी नाव पुढे आणण्याचे प्रय} करूनही काही साध्य झाले नाही. आता अमरिश पटेल यांनी राहुल गांधी यांना धुळ्यात आणून आपला करिष्मा दाखवून दिला. त्यातून तिकीटही मिळविले. यातून जवाहर गट आणखी खचत गेला.
काँग्रेसमधून सुभाष देवरेंना मिळाला लाभ
सुभाष देवरे यांना माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे शालक म्हणून काँग्रेसने बर्‍याचदा पदे दिली. महाफेडसारखा संस्थेचे अध्यक्षपद दिले. जिल्हा परिषदेत उपाध्यक्षांसारखी पदे वारंवार मिळाली. तरीही देवरेंचा ओढा भाजपकडेच आहे. ज्या काँग्रेसने प्रतिष्ठा दिली त्या काँग्रेस व त्याच्या उमेदवारामागे रोहिदास पाटील यांनी उभे राहण्याचा निर्णय नाइलाजाने का होईना घेतला आहे. काँग्रेस एकत्र आहे, हे दाखविण्याचा प्रय} केला आहे. त्याच मेव्हण्याच्या पाठीमागे उभे न राहता सुभाष देवरे वेगळा सवतासुभा शोधत आहे, यावरूनच जवाहर गटात किती बेबनाव आहे, हे दिसून येते.