आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Tapi Scheme, Electricity Supply

तापी योजनेवरील वीज पुरवठा खंडित झाल्याने पाणीटंचाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसामुळे विद्युत तारा तुटून तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्राचा विद्युतपुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा सुरळीत होण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा समस्या निर्माण होणार आहे.


सोमवारी झालेल्या वादळ, पावसामुळे शहर तापी पाणीपुरवठा योजनावरील सुकवद पंपिंग स्टेशन व बाभळे जलशुद्धीकरण केंद्र येथील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे. विद्युत वितरण कंपनीमार्फत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. केंद्राचा विद्युतपुरवठा गुरुवारी(दि.27) रोजी सायंकाळपर्यंत सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे तापी पाणीपुरवठा योजनेवरून शहरात होणारा नवरंग जलकुंभ,नेहरूनगर, जलकुंभ, एम.बी.आर. जलकुंभ, बडगुजर जलकुंभ, मायको टॉवरजलकुंभ, मोहाडी जलकुंभ, चक्करबर्डी जलकुंभ, दसेरा मैदान जलकुंभावरील होणारा पाणीपुरवठा विद्युतपुरवठा सुरू होईपर्यंत बंद राहणार आहे. हा पुरवठा 28 फेब्रुवारीपासून सुरळीत होईल, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. परंतु आजही गारपीट झाल्याने विद्युतपुरवठा सुरळीत होण्यास अडचणी निर्माण होत असल्याने आणखी दोन-तीन दिवस पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. परिणामी धुळेकरांना पाणीटंचाईची समस्या जाणवू शकते.