आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Traffic Police, Driver, N.Ambika, Divya Marathi

110 वाहनचालकांकडून 12 हजारांचा दंड वसूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाहतूक पोलिसांनी रविवारी दिवसभरात सुमारे 110 वाहनचालकांवर कारवाई केली. या कारवाईत 12 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.वाहनांची तपासणी करण्यासोबत अप्पर पोलिस अधीक्षक एन.अंबिका यांच्या आदेशावरून सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील चौकांमध्ये नाकाबंदी करण्यात आली. या वेळी वाहनांची कसून तपासणी करण्यात येऊन दोषी वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. अचानक झालेल्या या नाकाबंदीमुळे शहरात काहीतरी घडले तर नाही ना? अशी शंका अनेकांना आली.


कागदपत्रे जवळ न ठेवणे पडले महागात
विनापरवाना वाहन चालवणे, कागदपत्रांची अपूर्णता, प्रमाणापेक्षा अधिक प्रवासी बसवणे आदी कारणांसाठी ही कारवाई करण्यात आली.