आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारू दुकानाच्या विराेधात तरुणांसह महिला एकवटल्या; वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून अांदाेलन करण्याची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोईटेनगर- सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे दारू विक्रेत्यांची गाेची झाली असून ४५ दारू दुकाने स्थलांतरित करण्यासाठी जाेरदार हालचाली सुरू झाल्या अाहेत. भिकमचंद जैननगरात पिंप्राळा राेडवर येऊ घातलेल्या दारू दुकानाला प्रखर विराेध करण्यासाठी अाता परिसरातील तरुणांसह महिलादेखील एकवटल्या अाहेत. प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी नागरिकांनी दाखवली असून बैठकांचे अायाेजन केले जात अाहे. 
 
शहरातील सहा रस्ते अवर्गीकृत करण्याचा निर्णय रद्द झाल्यानंतर ४५ दारू दुकानदारांनी दुकाने स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्या दृष्टीने शहरातील माेक्याच्या वर्दळीच्या जागांचा शाेध घेतला जात अाहे. भिकमचंद जैननगर भाेईटेनगराचा मुख्य रस्ता असलेल्या पिंप्राळा राेडवरील एका काॅम्प्लेक्समध्ये वाईन शाॅप शिफ्ट हाेत असल्याने त्याला स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विराेध केला अाहे. दारू दुकानाच्या स्थलांतरासाठी नागरिकांच्या नाहरकतची गरज नसल्याचे नागरिकांना सांगितले जात असून त्याला प्रखर विराेध करण्यासाठी अाता नागरिक एकवटू लागले अाहेत. भिकमचंद जैननगरातील नागरिकांनी अाता गटागटाने चर्चा सुरू केल्या अाहेत. विशेष म्हणजे यात तरुणांनी पुढाकार घेतला अाहे. 
शहरातील गणेश काॅलनी चाैक रामानंदनगर परिसरातील वाईन शाॅपवर हाेणारी ग्राहकांची गर्दी त्यामुळे हाेणारी वाहतूक काेंडीचा त्रास हाेऊ नये तसेच घराजवळ दारूचे दुकान येऊ नये, अशी भावना महिलांची अाहे. त्यामुळे महिलांनीही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून अांदाेलन करण्याची तयारी केली अाहे. 
 
नागरिकांच्या भावनांचा विचार व्हावा 
पिंप्राळाराेडवरील काॅम्प्लेक्समध्ये दारू दुकान येत असल्याची माहिती अाहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अामचा विराेध नाेंदवला अाहे. जर नागरिकांच्या भावनांच्या विराेधात निर्णय हाेत असेल, तर भिकमचंद जैननगर, भाेईटेनगर परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरतील. वाॅर्डातील नागरिक, तरुण महिलांच्या बैठकांचे नियाेजन सुरू अाहे. प्रशासनाने नागरिकांच्या भावनांचा विचार करणे गरजेचे अाहे. - संदेश भाेईटे, नगरसेवक 
बातम्या आणखी आहेत...