आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नूतन मराठा’तील कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- नूतन मराठा महाविद्यालयात झालेल्या कॉपी प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या प्रकरणात विद्यापीठाने चौकशी समिती गठित केली आहे. या समितीची पहिली बैठक झाली. वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या छायाचित्रांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पहिलीच बैठक असल्यामुळे अद्याप ठोस निर्णय घेण्यात आले नाही. मात्र, येत्या आठवड्यात दुसरी बैठक होणार आहे. यात ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केलेल्या कॉपीच्या प्रकाराचे छायाचित्र विचारात घेतले जाणार आहे. या छायाचित्रांमध्ये दिसून येणारे प्राध्यापक, विद्यार्थी यांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत.

सहसंचालकांकडूनही चौकशी : उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक व महाविद्यालाचे प्रशासक डॉ.ए.बी.साळी यांनीही कॉपी प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.सुर्वसे यांना कार्यालयात बोलावून माहिती जाणून घेतली. तसेच येत्या आठवड्यात डॉ.साळी महाविद्यालयात जाऊन चौकशी करणार आहेत, अशी माहिती डॉ.साळी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली आहे.