आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पालिका उद्योजकांपुढे नमली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्यभरातील उद्योजकांना 2 ते 4 टक्के एलबीटीचे दर निश्चित केले असले तरी जळगावातील उद्योजकांनी 2 टक्के एलबीटी भरण्यास साफ नकार दिला आहे. सक्ती केल्यास एक पैसाही न भरण्याचा इशारा उद्योजकांनी दिल्याने प्रशासनाला नमते घ्यावे लागले आहे. उद्योजकांसाठी 1 टक्का एलबीटीसाठी दुरुस्तीपत्रक काढले जाणार आहे. महापालिका हद्दीतील उद्योगांसाठी कच्च्या मालावर 1 डिसेंबरपासून 1 ऐवजी 2 टक्के एलबीटी आकारणी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने उद्योगांना लागणारा कच्चा माल व इतर बाबींसाठी 2 ते 4 टक्के एलबीटी आकारणीचा स्लॅब तयार करून दिला आहे. जळगावात 2 टक्के आकारणी करण्यात आली असली तरी लहान उद्योजकांना ते परवडणारे नाही. त्यामुळे उद्योजकांकडून या गोष्टीला विरोध होत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी उद्योजक व आयुक्त संजय कापडणीस यांच्यात वेळोवेळी बैठका सुरू आहेत. अखेर सुधारित दुरुस्तीपत्रक पाठवण्यास प्रशासन सकारात्मक झाले आहे.
प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात
उद्योजकांच्या कच्च्या मालावर 1 टक्के एलबीटीसंदर्भात प्रशासन व व्यापारी प्रतिनिधींमध्ये बैठका सुरूच आहेत. सरसकट 1 टक्का एलबीटीसंदर्भात प्रशासन सकारात्मक दिसत असून आज-उद्यात प्रस्ताव पाठवणार आहे. भुवनेश्वर सिंग, अध्यक्ष जिंदा
शासनाने उद्योजकांना एलबीटीचा 2 ते 4 टक्केचा स्लॅब निश्चित केला असला तरी जळगावात ते शक्य नाही. सक्तीने अंमलबजावणी करायचे म्हटल्यास आहे ते उद्योगही स्थलांतरित होऊन पालिकेला मिळणारा महसूलही बुडेल. पुरुषोत्तम टावरी,
समन्वय समिती सदस्य
उद्योजकांच्या बाबतीत प्रशासन सकारात्मक आहे. यासाठी रेमंड, सुप्रीम, लिग्रॅण्ड यांनाही इतरांप्रमाणे एलबीटीच्या कक्षेत आणण्यासह व्यापार्‍यांची एक टक्का मागणीचा प्रस्ताव तयार करण्यासंदर्भात विचार सुरू आहे.
उदय पाटील, सहायक आयुक्त एलबीटी