आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक बांधिलकीला दिली तंत्रज्ञानाची जोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- 80 वर्षांची वाटचाल करणा-या जळगाव पीपल्स बँकेने गेल्या आठ वर्षांत सर्वच अंगाने प्रगती केली. भालचंद्र पाटील यांनी बदलत्या काळाची पावले ओळखून नवीन तंत्रज्ञान स्वीकारले. त्यामुळेच बँकेचा कायापालट होऊ शकला. ज्या घराण्यात बांधिलकीची भावना आहे तेथे काहीच अशक्य नाही, असे उद्गार जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांनी काढले.
जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील यांना ‘बँकिंग फ्रंटिअर्स 2015 चा बेस्ट चेअरमन’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जिल्हा अर्बन को-ऑप. बँक असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी कांताई सभागृहात सत्कार करण्यात आला. जैन उद्योग समूहाचे संस्थापक भवरलाल जैन अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून सीए विनायक गोविलकर, ज्येष्ठ कवी ना.धों. महानोर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटकर, बँक असोसिएशनचे अध्यक्ष दुर्गादास नेवे, ज्ञानेश्वर महाजन उपस्थित होते. या वेळी भालचंद्र पाटील यांचा सप्नीक मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांनी सत्कार केला. सत्कार सोहळ्याप्रसंगी कांताई सभागृह असे भरले होते.
सहकारी संस्थांचे चित्र गढूळ
सहकारीसंस्था उभ्या करायच्या आणि त्या मोडकळीस आणायच्या असा छंद महाराष्ट्राला लागला आहे. त्यामुळे सहकारी संस्थांचे चित्र गढूळ झाले आहे. मात्र, पीपल्स बँकेसारखी संस्था 80 वर्षांपासून तग धरून असून तिने यशाचे शिखर गाठले आहे. अनेकांना उभे करण्याचे काम या बँकेने केले, असे गौरवोद््गार कवी ना.धों. महानोर यांनी काढले.
समाजाला चांगल्या माणसांची गरज
विनायकगोविलकर म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात चिंताजनक स्थिती असतानाही पीपल्स बँकेचे यश वाखाणण्याजोगे आहे. समाजासाठी आपलं म्हणून काम करणाऱ्या माणसांची सध्या खूप गरज आहे. त्यातले भालचंद्र पाटील हे एक आहेत. चांगली माणसं समाजासमोर आल्यास समाजाचं चित्र बदलू शकतं. मात्र, समाजातील नकारात्मकताच पुढे आणण्याचे काम सुरू आहे.
दोन वर्षांत एनपीए शून्यावर आणणार
श्रीरामाच्यारथोत्सवाची 144 वर्षे पूर्ण झाली असून या रथाचा मार्ग हा बँकेला वळसा घालणारा आहे. ज्या सीतेच्या भोवती लक्ष्मणाने लक्ष्मण रेषा ओढली होती. त्याचप्रमाणे श्रीरामाच्या रथ मिरवणुकीच्या रेषेमुळे बँकेवर कुठलेही संकट आले नाही, अशी भावना भालचंद्र पाटील यांनी व्यक्त केली. दोन वर्षांत एनपीए शून्यापर्यंत नेण्याचे आव्हान त्यांनी या वेळी स्वीकारले.