आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुले मार्केट गाळेधारकांनी दाखवली करार करण्याची तयारी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - हुडकोला फेरप्रस्ताव सादर केल्यानंतर आता तीन महिन्यांत गाळे करारातून पैसा उभारायचा आहे. मार्केट हा एकमेव पर्याय असल्याने काही उपयोग नसल्याची जाणीव आता गाळेधारकांनाही होऊ लागली आहे. त्यामुळे काही गाळेधारकांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेऊन कराराची प्रोसेस समजावून घेतली. तसेच एकाने करार करण्याची तयारीही दर्शवली आहे.

हुडकोचे कर्ज भरण्यासाठी फुले मार्केट सेंट्रल फुले मार्केटमधील गाळ्यांचे प्रीमियम घेऊन ३० वर्षांचा करार करणे अथवा जाहीर लिलाव करणे हा महत्त्वाचा पर्याय मानला जात आहे. पालिकेने नुकताच हुडको राज्य सरकारला १८ कोटी ५१ लाखांचा फेरप्रस्ताव दिला आहे. हुडकोकडून अद्याप उत्तर प्राप्त झाले नसून त्यांच्याकडून फेरप्रस्तावावर काय भूमिका मांडली जाते, यावर पुढची चर्चा अवलंबून राहणार आहे. एकंदर हुडकोने फेरप्रस्तावात एखादा आकडा स्पष्ट केला तर त्यादृष्टीने लवकर रक्कम उभारावीच लागणार आहे. त्यादृष्टीने घडामोडींना वेग आला आहे.

जुने दर लावणार
वर्ष बदलल्यामुळे नवीन रेडिरेकनर दर लागू झाले आहेत. मात्र, मार्च २०१५ पर्यंत गाळेकरार करण्यासाठी जुन्याच दराने आकारणी केली जाईल, असा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यामुळे करार करणाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
तीन गाळेधारकांनी केली चर्चा
शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास फुले मार्केटमधील एका दुकानदाराने आयुक्त संजय कापडणीस यांची भेट घेतली. सध्या व्यवसाय करीत असलेल्या दुकानाची किंमत जाणून घेतल्यानंतर कराराची तयारीदेखील दाखवली आहे. त्याचप्रमाणे कराराची प्रक्रिया कशी राहील? याची माहिती आयुक्तांनी समजावून सांगितली. अशाप्रकारे दोन ते तीन गाळेधारकांनी आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
तर लिलावात स्पर्धा निर्माण होईल

सध्या फुले मार्केट सेंट्रल फुले मार्केटमध्ये व्यवसाय करीत आहे, अशा दुकानदारांव्यतिरिक्त ज्यांना दुकाने खरेदी करण्याची इच्छा आहे. अशा व्यापाऱ्यांकडून कराराच्या दृष्टीने तसेच जाहीर लिलाव झाल्यास खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. मध्यवर्ती भागातील मार्केटमध्ये दुकान खरेदी करून व्यवसायासाठी आता मानसिकता तयार व्हायला लागली असल्याचे पालिकेतील गप्पांमधून स्पष्ट होऊ लागले आहे. त्यामुळे आगामी काळात करार अथवा जाहीर लिलावात मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यताही वर्तवली जाते.