आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव पोलिसांची ‘समाधान हेल्पलाइन’ लवकरच राज्यभरात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पोलिसअधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अधीक्षक कार्यालयात अनेक प्रशासकीय कामे असतात. त्यामुळे कर्मचाऱ्याला पोलिस अधीक्षक कार्यालयात यावे लागते. मात्र, ही कामे ड्यूटीवर असलेल्या ठिकाणावरून व्हावीत, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी नाेव्हेंबरपासून ‘समाधान हेल्पलाइन’ नावाने उपक्रम सुरू केला आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्याने पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी शनिवारी मुंबईत बैठक घेतली.

महिन्यांतसोडवल्या १६३ तक्रारी
पोलिसअधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर असलेल्या कामाच्या ताणामुळे त्यांची स्वत:ची कामे होत नाहीत. त्यांची कामे बसल्या जागेवरून व्हावीत, यासाठी जळगाव पोलिस प्रशासनाने ‘समाधान हेल्पलाइन’ सुरू केली. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नाेव्हेंबरमध्ये १०९ आणि डिसेंबरमध्ये ५४ तक्रारी सोडवल्या आहेत.

महासंचालकांसमोर‘डेमो’
पोलिसांच्यासमस्या सोडवण्यासाठी ‘समाधान हेल्पलाइन’ हा राज्यातील पहिलाच प्रयोग जळगावात राबवण्यात येत आहे. त्याचे महत्त्व ओळखून राज्याच्या पोलिस महासंचालकांनी शनिवारी बैठक बोलावली होती. त्यात डॉ.सुपेकर यांनी या हेल्पलाइनचे सादरीकरण करून ती पोलिसांसाठी कशी उपयुक्त आहे, ते पटवून दिले. त्यामुळे भविष्यात हा प्रयोग राज्यभरात राबवला जाण्याची शक्यता आहे.

असेआहे हेल्पलाइनचे काम
‘समाधान हेल्पलाइन’चा ०२५७-२२३३५६९ हा क्रमांक जिल्‍हृयातील सर्व पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना दिला असून, त्यासाठी दाेन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. कोणीही पोलिस अधिकारी वा कर्मचारी कार्यालयीन वेळेत सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत या क्रमांकावर कॉल करून आपली तक्रार किंवा अडचण नोंदवू शकतो. तक्रार नोंदवून संबंिधताला तक्रार क्रमांक देण्यात येतो. तसेच दुसऱ्या दिवशी तक्रार ज्या विभागाशी संबंिधत आहे त्यांच्याशी संपर्क साधून तक्रार निवारण करण्यास किती कालावधी लागेल? याची माहिती घेऊन तक्रारकर्त्याला कळवण्यात येते. त्यानंतरही तक्रार नोंदवून अडचण दूर होत नसल्यास संबंिधत कर्मचारी पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्याशी संपर्क साधून अडचण सोडवून घेऊ शकतो. हा उपक्रम सुरळीतपणे चालावा म्हणून पोलिस निरीक्षक, मानव संसाधन (वेल्फेअर) हे दररोज कामाचा आढावा घेऊन पोलिस उपअधीक्षक (गृह) यांच्याकडे आढावा सादर करतात. त्याचप्रमाणे अप्पर पोलिस अधीक्षक दर आठवड्याला तक्रारींची पडताळणी करतात आणि दर १५ दिवसांनी पोलिस अधीक्षक या उपक्रमाचा आढावा घेत असतात.