आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जळगाव- माजी आमदार संतोष चौधरी यांना सेवा पुरविणार्या व खासगी कारमधून न्यायालयात जाण्यास परवानगी देणार्या त्या तिघा पोलिसांची चौकशी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या तिघांना पोलिस उपअधीक्षक (गृह) वाय.डी. पाटील यांनी कारवाईची नोटीस बजावली आहे. पोलिस अधीक्षक एस.जयकु मार हे बाहेरगावी असल्याने बुधवारीदेखील ही प्रक्रिया फक्त नोटीस पुरतीच र्मयादीत राहिली.
भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी हे सध्या खंडणीच्या गुन्ह्यात कारागृहात आहेत. त्यांच्या खटल्याचा अंतिम निकाल 11 जुलैला लागणार आहे. चौधरी गेल्या आठवड्यापासून दररोज सुनावणीसाठी कारागृहातून न्यायालयात ये -जा करीत आहेत. दरम्यान चौधरी यांना कारागृहातून न्यायालयात नेण्यासाठी सरकारी पोलिस गाडीची सुविधा असतानादेखील त्यांच्या पहार्यावर असलेले पोलिस कर्मचारी मात्र त्यांना खासगी कारमधून ये- जा करण्यास परवानगी देत असल्याचा प्रकार मंगळवारी ‘दिव्य मराठी’ने उजेडात आणला. त्यानंतर पोलिस दलाच्या वरिष्ठ पातळीवर कारवाईला सुरुवात झाली आहे. सोमवारी पोलिस उपअधीक्षक (गृह) वाय.डी. पाटील यांनी याप्रकरणी प्रभारी राखीव पोलिस निरीक्षक वाय.एस. पाटील यांच्याकडून चौकशी केली होती. त्यानंतर चौधरींच्या पहार्यावर असलेले पोलिस कर्मचारी सुरेश भदाणे, विष्णू भील, मेहरबान तडवी यांची चौकशी करण्यात आली होती. मंगळवारी त्या तिघांना आपणावर कारवाई का करण्यात येऊ नये? अशा नोटीस बजावण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक एस. जयकुमार हे शासकीय कामानिमित्त पुणे येथे गेलेले असल्याने मंगळवारी करण्यात आलेली कारवाई नोटिस पुरतीच र्मयादीत राहिली. पोलिस कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिस अधीक्षकांनाच असल्याने बुधवारी किंवा गुरुवारी अधीक्षक आल्यानंतर ही कारवाई करण्यात येणार आहे. चौधरी यांना कारागृहातून न्यायालयात नेण्यासाठी वापरण्यात आलेली पांढर्या रंगाची स्विप्ट कार कोणाची? याबाबत देखील पोलिस उपअधीक्षकांनी माहिती काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.