आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Police News In Marathi, Security Issue, Divya Marathi

87 पोलिसांवर शहराची मदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - वाढत्या लोकसंख्येच्या मानाने शहरात दिवसेंदिवस वाहन संख्याही वाढते आहे. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी होत आहे. शहरात 2 लाख 65 हजार वाहने असून केवळ 87 वाहतूक पोलिस त्यावर नियंत्रण ठेवत आहेत.
शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांपर्यंत झाली आहे. तसेच शहरालगत असलेल्या शेकडो गावांमधून दररोज हजारो नागरिक शहरात ये-जा करतात. दुचाकी, चारचाकी, प्रवासी वाहने सर्व प्रकारच्या वाहनांची शहरातील रस्त्यांवर गर्दी होते. परिणामी पादचार्‍यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. तसेच किरकोळ अपघातांचीही संख्या वाढली आहे. चौक जवळ-जवळ असल्यामुळे एका चौकात वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर त्याचा परिणाम इतर चौकांवर होत आहे. शहरात रहदारीचे प्रमुख 20 चौक आहेत. याशिवाय 20 पेक्षा जास्त लहान चौक आहेत. काही चौकांमधील दिशादर्शक दिवे बंद असल्यामुळे वाहनचालक मनाप्रमाणे वाहने चालवतात. लहान चौकांमध्ये वाहतूक पोलिस उपलब्ध होत नसल्यामुळे बेशिस्त वाहतुकीचे दर्शन होते.


118 पदे मंजूर
शहरात वाहतूक पोलिसांची 118 पदे मंजूर आहेत. यापैकी 87 पोलिस कर्मचारी उपलब्घ आहेत. मोर्चा, रास्ता रोकोच्या वेळी एखाद्या चौकात कोंडी झाल्यास सुमारे 25 कर्मचारी एकाच ठिकाणी काम करतात. अशा वेळी इतर चौक उघडे पडतात. परिणामी किरकोळ अपघात होत असतात.


सिग्नल अर्धा दिवस बंद
भारनियमनामुळे अनेक चौकांतील सिग्नल बराच वेळ बंद असतात. अशा वेळी वाहतूक पोलिसांना मॅन्युअली वाहतूक नियंत्रित ठेवावी लागते. अशा वेळी कर्मचारी संख्या कमी असल्यास कोंडी होते. बेशिस्त पार्किंगवर नियंत्रण ठेवणेही पोलिसांना शक्य होत नाही.


सिग्नल दिवसातून तीन तास बंद
टॉवर चौक ते आकाशवाणी या मार्गावर पाच प्रमुख चौक आहेत. अनेक शाळा, महाविद्यालये, कार्यालये याच मार्गावर आहेत. भारनियमनामुळे दिवसभरातून एकदा दुपारी 12.30 ते 3.30 किंवा 3.30 ते 6.30 या वेळेत सर्वच चौकातील सिग्नल बंद असतात. त्यामुळे वाहतुकीची गैरसोय होते. अचानकपणे विजेची अडचण निर्माण झाल्यानंतरही सिग्नल बंद असतात. अशा वेळी वाहतूक पोलिस आवश्यक असतात. मात्र, संख्या कमी असल्यामुळे एकाच पोलिसाला संपूर्ण चौकाची वाहतूक सुरळीत करणे कठीण होते.

वाहतूक पोलिसांची संख्या सुरुवातीला 70 होती. नुकतीच वाढवण्यात आली आहे. यापेक्षा जास्त मनुष्यबळ उपलब्ध होणार नसल्यामुळे आता कर्मचार्‍यांच्या वेळेचे नियोजन करून वाहतूक नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. रामकृष्ण भोसले, निरीक्षक, वाहतूक पोलिस शाखा