आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील पाेलिस क्वाॅर्टरची जागा अखेर मनपाच्या ताब्यात, महापाैरांकडून पाहणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - काव्यरत्नावली चौकात नयनरम्य बेट आणखी एक नवीन मीटरचा रस्ता तयार करण्याचा मार्ग माेकळा झाला अाहे. गेल्या काही वर्षांपासून पाेलिस अधीक्षकांच्या बंगल्याशेजारील जागा महापालिकेकडे हस्तांतरीत अर्थात ताब्यात घेण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात अाली. त्या ठिकाणचे जुने बांधकाम पाडून या जागेचे अाकर्षक डिझाइन तयार करण्याचे काम हाती घेण्यात अाले अाहे. 
 
शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या काव्यरत्नावली चाैकातील ‘भाऊंचे उद्यान’ पाठाेपाठ अाता या चाैकातील डाव्या हाताकडील माेठी जागादेखील महापालिकेला विकसित करता येणार अाहे. पाेलिस अधीक्षकांच्या निवासस्थानाशेजारी त्यांच्या पाेलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने बांधण्यात अाली हाेती; परंतु ही जागा डीपी रस्त्यासाठी अारक्षित असल्याने पालिकेने पाेलिसांसाठी नव्याने निवासस्थाने बांधून दिली हाेती. त्यानंतरही या जागेचा ताबा पालिकेकडे अालेला नव्हता. त्यामुळे या जागेवर काहीही नियाेजन करता येत नव्हते. परंतु जलसंपदामंत्री गिरीश महाजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर अखेर मंगळवारी पाेलिस अधीक्षकांनी या जागेचा ताबा पालिकेकडे दिला अाहे. महापाैर नितीन लढ्ढा, माजी स्थायी समिती सभापती नितीन बरडे, शहर अभियंता दिलीप थाेरात, सहायक अभियंता सुनील एस. भाेळे, अभियंता अार. टी. पाटील यांच्या उपस्थितीत जागेचा ताबा घेऊन त्या ठिकाणचे जुने बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात अाली. 
 
५३हजार चाैरस फूट जागा 
शहरातीलपाॅश एरिया अशी अाेळख असलेल्या गणपतीनगर अादर्शनगरला लागून असलेल्या काव्यरत्नावली चाैकात पालिकेच्या मालकीची सुमारे ५३ हजार चाैरस फूट जागा अाहे. या जागेवर पूर्वी नाना-नानी पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. परंतु ही जागा डीपी रस्त्यासाठी अारक्षित असल्याने उद्यान करता येणार नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने मजीप्रचे रेस्ट हाऊस असलेल्या जागेवर भाऊंचे उद्यान उभारण्यात अाले. अाता ही जागा ताब्यात असल्याने त्या ठिकाणी अाकाशवाणीकडून काव्यरत्नावली चाैक मार्गे शिरसाेली नाक्याकडे जाण्यासाठी चाैकापासून काही अंतरावर नव्याने मीटरचा रस्ता तयार केला जाणार अाहे. तसेच चाैकाला लागून असलेल्या रस्त्याच्या नवीन डीपी रस्त्याच्या मध्यभागी ट्रॅफिक अायर्लंड उभारले जाणार अाहे. 
 
लोकसहभागातून जागेचा विकास करणार 
महापालिकेने या जागेचा विकास करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी लाेकसहभागातून मदत घेण्याचा विचार सुरू अाहे. यासाठी अार्किटेक्ट शिरीष बर्वे यांच्या मदतीने चांगले डिझाइन तयार केले जाणार अाहे. त्या ठिकाणी पार्किंगसह नागरिकांच्या मनाेरंजनाच्या दृष्टीने पाेलिस मनपाच्या विचारविनिमयाने नियाेजन केले जाणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...