आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांनी बघितला एमएस धाेनी चित्रपट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - सण उत्सवाच्या काळात पाेलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिकच काम असते. या कामाचा तणाव दूर करण्यासाठी पाेलिस कल्याण मानव संसाधन विभागातर्फे शनिवारी शहरातील ५१२ पाेलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांना नटवर मल्टीप्लेक्समध्ये एम. एस. धाेनी अन् टाेल्ट स्टाेरी हा चित्रपट दाखवण्यात अाला.

पाेलिस अधीक्षक डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी तणाव दूर करण्यासाठी ही संकल्पना राबवली. गणेशाेत्सव, दुर्गाेत्सव, बकरी ईद, माेहरम हे सण उत्सव नुकतेच पार पडले. या सणाेत्सवांमध्ये कायदा सुव्यवस्था कायम रहावा, यासाठी पाेलिस अधिकारी, कर्मचारी काेणताच सण परिवारासाेबत साजरा करत नाहीत. सणाेत्सवानंतर अाता अागामी काळात जिल्ह्यातील पालिका निवडणुका येत अाहेत. त्यामुळे बंदाेबस्ताचा तणाव दूर करण्यासाठी डाॅ. सुपेकर यांनी शनिवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना चित्रपट दाखवण्याचा अनाेखा उपक्रम राबवला. यात शहर, शनिपेठ, एमअायडीसी, रामनंदनगर, तालुका, जिल्हापेठ पाेलिस ठाण्यासह शहर वाहतूक शाखा, मुख्यालय अशा ५१२ कर्मचाऱ्यांनी पाेलिस अधीक्षक डाॅ. सुपेकर, अपर पाेलिस अधीक्षक माेक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर, महारू पाटील यांनी चित्रपट पाहिला.
बातम्या आणखी आहेत...