आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Politics Gulabrao Patil Challenge Minister Gulabrao Deokar

गुलाबराव, लढायला मी सज्ज आहे; देवकरांना पाटलांचे प्रतिआव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ‘गुलाबराव, मी तर तुमच्याविरुद्ध निवडणूक लढविण्यासाठी लंगोट बांधून तयार आहे. तुमच्या इतका पैसा माझ्याकडे नसला तरी जनता जनार्दनाच्या ताकदीवर माझा विश्वास आहे’, अशा शब्दात शिवसेनेच्या गुलाबराव पाटलांनी पालकमंत्री गुलाबराव देवकरांना आज प्रतिआव्हान दिले.

पालकमंत्री देवकर यांनी ‘गुलाबराव पाटलांना आपल्याविरुद्ध निवडणुकीत विजय मिळणार नाही याची खात्री असल्यानेच ते आपण लोकसभेची निवडणूक लढविणार असल्याचा खोटा प्रचार करीत आहेत,’ असा आरोप शुक्रवारी केला होता. उपनेते पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा आरोप खोडून काढला आणि निवडणूक लढविण्याचे प्रतिआव्हान दिले. त्यांनी केलेले दावे आणि आरोप त्यांच्याच शब्दात.

‘चाळीसगाव तालुक्यासाठी दोन पाणी मंजूर असताना पालकमंत्र्यांच्या आदेशाने तिसरे आवर्तन गिरणेत सोडण्यात आले. हे पाणी जर अंजनीत सोडले असते तर पाणी चांदसरपर्यंत येऊन पोहोचले असते. त्याचा फायदा धरणगाव तालुक्यातील 25 ते 30 गावांना झाला असता. मात्र, देवकरांनी स्वत:च्या मतदारसंघावर प्रेम न दाखविता फक्त चाळीसगावसाठी स्वतंत्र आदेश केले. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे, असे मी म्हटले होते. पालकमंत्र्यांनी पाण्याच्या विषयात राजकारण न आणता आपली जबाबदारी लक्षात ठेवून काम करावे, एवढीच माझी अपेक्षा आहे. या देशात जनता जनार्दन सर्वर्शेष्ठ आहे. जनतेने इंदिरा गांधींना हरविले आहे. त्यामुळे दोन वेळा विधानसभा जिंकूनही मी मागच्या निवडणुकीतील पराभव स्वीकारला आहे. देवकर तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतच पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आपला पराभव आधी आठवावा.

देवकर यांनी जिल्ह्यात कोणता उद्योग आणला? देवकरांचा उद्योग फक्त जळगाव कन्स्ट्रक्शन एवढाच आहे. धरणगावच्या उड्डाण पुलाच्या प्रo्नावर ते गेले चार वर्षे लोकांच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. विकासाच्या गोष्टी त्यांनी करू नये. जे पालकमंत्री स्वत:च्या मतदारसंघात 23 दिवस इलेक्ट्रीक डीपी देऊ शकत नाहीत ते काय विकास करणार? मी त्यांना आव्हान देतो. त्यांनी मला एक महिन्यासाठी मंत्रिपद द्यावे. मी दाखवितो मंत्री म्हणून काय करता येते ते. देवकर माझा एकही कार्यकर्ता गेल्या चार वर्षांत फोडू शकले नाहीत. धरणगाव तालुक्यात एकही स्थानिक स्वराज्य संस्था त्यांच्या ताब्यात नाही. हे त्यांचे अपयशच आहे. चिमणराव पाटील हे शिवसेनेचे आमदार असले तरी अंजनीत पाणी सोडण्याबाबत त्यांच्या तालुक्याच्या दृष्टीने त्यांचा विचार वेगळा असू शकतो. राष्ट्रवादीत किती गट- तट आहेत हे देवकरांनी पहावे. मग सेनेच्या गटातटांचा विचार करावा. मला आमदारकीची उमेदवारी द्यावी की, नाही द्यावी हे ठरविण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे. देवकरांनी माझ्या उमेदवारीचा विचार करण्यापेक्षा स्वत:चा विचार करावा’.

देवकर ‘ढ’ मंत्र्यांच्या यादीत पहिले

राज्यातील एकूण सर्व मंत्र्यांचा राज्य सरकारने सव्र्हे केला आहे. या सव्र्हेत त्या मंत्र्यांची विकासकामे, विधानसभेतील त्यांचे कामकाज, कामांसाठीचा आग्रह आणि त्यांचे जिल्ह्यातील प्रभुत्व याचा अभ्यास करण्यात आला आहे. यात चार-पाच मंत्री ‘ढ’आढळले. यात देवकरांचा नंबर पहिला आहे, असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

(छायाचित्र - गुलाबराव देवकर)