आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Politics News In Marathi, Lok Sabha Election, BJP, Divya Marathi

भाजप उमेदवाराचा घोळ संपूनही मित्रपक्षाला सन्मान नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या असल्या तरी शहरातील शिवसेनेला अजूनही सन्मानाने बोलावण्याची वाट पाहावी लागत आहे. शहरातील शिवसैनिक केवळ आदेश मिळताच कामाला लागतील, अशी प्रतिक्रिया अँड. शाम श्रीगोंदेकर यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.
उमेदवार निश्चितीमुळे गोंधळलेल्या भाजपने रक्षा खडसेंच्या नावावर एकमत होताच प्रचार सुरू केला. मात्र, महायुतीमधील मित्रपक्षाचा एकही पदाधिकारी या प्रचारात दिसत नाही. परिणामी प्रचार आणि आगामी नियोजनापासून शिवसेना आणि रिपाइं दोन हात दूर असल्याचे चित्र आहे. याबाबत शिवसेनेचे शहराध्यक्ष अँड.श्रीगोंदेकर यांच्याशी संपर्क साधला असता, महायुतीच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी सर्वच शिवसैनिक बांधिल आहेत. मात्र, अजूनही संयुक्त बैठक झालेली नाही, कोणत्याही प्रकारचा निरोप नाही. गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा दुपटीने मताधिक्क्य़ मिळवता येईल, अशी स्थिती आहे. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे शहरातील शिवसैनिकांसाठी अनुकूल आहेत. त्यांचा सर्वांशी संपर्क असल्याने उमेदवाराला फायदा होईल. मात्र, नियोजनासाठी तातडीने संयुक्त बैठक होणे अपेक्षित आहे. आदेश मिळाल्यास शिवसैनिक जोमाने कामाला लागतील, असे सांगितले.


रविवारी राष्ट्रवादीचा मेळावा
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मित्रपक्षांचे उमेदवार मनीष जैन यांच्या प्रचार नियोजनासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संयुक्त कार्यकर्ता मेळावा येत्या रविवारी (दि.30) लोणारी मंगल कार्यालयात होणार आहे. या मेळाव्यास शहरातील चौधरी गटातील अर्धी राष्ट्रवादी उपस्थित राहील काय? यावर भविष्यातील गणिते अवलंबून असतील. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांनी मनीष जैन यांना शहरातून 10 हजारांवर मताधिक्क्य़ मिळवून देण्याचा दावा केला आहे.