आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुसयाबाईंनी पोलिसांना दाखवले घटनास्थळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रिधूरवाड्यातील प्रशांत सोनवणे याचा खून केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला मुख्य आरोपी नरेंद्र सपकाळे याची सासू अनुसया कोळी हिची शुक्रवारी चौकशी झाली. खून केल्यानंतर प्रशांतचा मृतदेह ज्या ठिकाणी जाळण्यात आला, ती शेळगाव शिवारातील जागा अनुसयाने पोलिसांना दाखवली.
प्रशांत सोनवणे खून प्रकरणातील आरोपी नरेंद्र सपकाळे, लक्ष्मी सपकाळे व प्रदीप पाटील यांच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. याच प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आलेली नरेंद्रची सासू अनुसया कोळी हिची तपासाधिकारी विवेक पानसरे यांनी चौकशी केली.
प्रशांतचा खून केल्यावर मृतदेहाची विल्हेवाट कशा पद्धतीने लावली, याबाबत विचारणा करून तिला शेळगाव शिवारात मृतदेह जाळलेल्या ठिकाणी नेण्यात आले होते. त्या ठिकाणी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या शेताच्या बांधाच्या काठावरची जागा तिने पोलिसांना दाखवली. दरम्यान, या गुन्ह्यातील अन्य संशयितांच्या चौकशीकडे तपासाधिकार्‍यांनी लक्ष वळवले असून, त्यांच्याकडूनही अजून काही माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.