आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशांत सोनवणे खून खटला : कैलास साेनवणेंसह १३ जणांवर अाराेप निश्चिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रशांत साेनवणे खून खटल्यात शुक्रवारी नगरसेवक कैलास साेनवणेंसह १३ जणांवर न्यायाधीश एम.क्यू.एस.एम.शेख यांच्या न्यायालयात खुनाच्या अाराेपाची निश्चिती करण्यात अाली. या वेळी सर्व अाराेपींनी गुन्हा नाकबूल असल्याचे सांगितले. या सर्व अाराेपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात अाले हाेते. याप्रकरणी अाता पुढील सुनावणी मे राेजी हाेणार अाहे.
श्रेयस पॅथाॅलाॅजी लॅबमध्ये काम करणाऱ्या प्रशांत साेनवणे याला अाॅगस्ट २०१२ रोजी रात्री ११.३० ते १२ वाजेदरम्यान रिधूरवाड्याच्या चाैकात बाेलावले. त्यानंतर प्रशांत परत अालाच नाही. त्यामुळे त्याच्या घरच्यांनी शाेधाशाेध सुरू केली. अाॅगस्ट २०१२ रोजी त्याचा मृतदेह शेळगाव रस्त्यावर अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडला हाेता. याप्रकरणी नशिराबाद पाेलिसात गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. नगरसेवक कैलास साेनवणे यांनी त्याचा खून केल्याचा अाराेप प्रशांतच्या अाई राधाबाई साेनवणे यांनी केला हाेता. त्यानंतर १३ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता.

नाव वगळण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाची चढली पायरी
खून प्रकरणात काहीही संबंध नसल्याचे सांगून नाव वगळण्यासाठी कलम ३१९ ची एफअायअार क्रॅश करण्यासाठी कैलास साेनवणे यांनी सर्वाेच्च न्यायालयापर्यंत मजल मारली हाेती. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळण्यात अाला हाेता. शेवटी साेनवणे यांना सर्व संशयित अाराेपींसह न्यायालयास शरण यावे लागले हाेते.

यांच्यावर अाराेप निश्चिती
कैलास नारायण साेनवणे, भारती कैलास साेनवणे, विलास नारायण साेनवणे, प्रल्हाद नारायण साेनवणे, संजय मुरलीधर साळुंखे, विशाल प्रल्हाद साेनवणे, नंदकिशाेर खुशाल सपकाळे, संजय प्रभाकर साळुंखे, जयदीप प्रल्हाद सपकाळे हे सध्या जामिनावर अाहेत; तर नरेंद्र दिगंबर सपकाळे, लक्ष्मी नरेंद्र सपकाळे, प्रदीप सुधाकर पाटील अािण अनुसयाबाई जनार्दन काेळी हे चारही जण सध्या जिल्हा कारागृहात अाहेत. याशिवाय दाेन अल्पवयीन बालकेही अाहेत.
३०२,३४ कलमान्वये अाराेप निश्चिती
प्रशांत साेनवणे खूनप्रकरणी १३ जणांवर ३०२ सह ३४ संगनमताने खून करणे अािण २०१ सह ३४ पुरावा नष्ट करणे या कलमान्वये अाराेपनिश्चिती करण्यात अाली अाहे. यासाठी ३४ साक्षीदारांची सर अािण उलट तपासणी घेण्यात अाली. शुक्रवारी २० मिनिटे युक्तिवाद झाल्यानंतर न्यायाधीश शेख यांच्या न्यायालयात अाराेपनिश्चिती करण्यात अाली. सरकारपक्षातर्फे अॅड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.