जळगाव - हप्ते थकल्यामुळे फायनान्स कंपनीने ग्राहकाची चारचाकी जप्त केली. त्यानंतर थकलेल्या हप्त्याचे पैसे ग्राहकाकडून रीतसर व्याजासह वसूल केले. मात्र, नंतर संबंधित ग्राहकाची संमती घेता चारचाकीची चक्क परस्पर विक्रीही करून टाकली. शनिवारी लोक अदालतीत सुरू असलेल्या तडजोडीवेळी हा प्रकार समोर आला. या प्रकरणात तडजोड तर झालीच नाही. मात्र, चारचाकी परत मिळाल्यामुळे ग्राहक फायनान्स कंपनीचा हा वाद आता चांगलाच चिघळला आहे.
गणेश कॉलनीतील सुनीता संतोष ठोंबरे यांनी २०१०मध्ये सेकंडहॅण्ड स्कोडा गाडी घेतली होती. त्यांनी सुरुवातीला लाख रुपये भरले होते. तसेच उर्वरित लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज शहरातील एका खासगी फायनान्स कंपनीकडून घेतले होते. कर्जापोटी त्यांना ११ हजार २०० रुपयांचा हप्ता बसला होता. मात्र, वर्षभरानंतर त्यांच्याकडून दोन हप्ते भरले गेले नाहीत. त्यामुळे त्या फायनान्स कंपनीने एमआयडीसीतील त्यांच्या कंपनीतून चारचाकी जप्त केली होती. त्यानंतर चेक बाउन्स झाल्यामुळे कंपनीने त्यांच्यावर खटलाही दाखल केला होता. त्यामुळे ठोंबरे कुटंुबीयांनी दंडासह सर्व पैसे भरले. परंतु, आता कंपनीने त्यांची स्कोडा गाडी परत देण्यास नकार दिला आहे. तसेच ही गाडी धुळ्यातील एका ग्राहकाला विकल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठोंबरे कुटंुबीयांना दिली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. तरीही तडजोड व्हावी या उद्देशाने शनविारी हे प्रकरण लोकअदालतीत ठेवले होते. तेथील चर्चेतून हा प्रकार उजेडात आला.
गाडीपरत देण्यास कंपनीचा नकार
फायनान्सकंपनीने ठोंबरे कुटुंबीयांवर लाख ८७ हजार रुपये कर्ज शलि्लक असल्याचे सांगितले आहे. हे पैसे भरल्यानंतर ठोंबरेंवर दाखल असलेला खटला मागे घेतला जाईल. मात्र, चारचाकी परत मिळणार नाही, असे उत्तर कंपनीने दिले आहे. तर मी दंडासह आतापर्यंत लाख हजार भरल्याचे ठोंबरे यांनी सांगितले. तसेच चारचाकी जप्त केली त्या वेळी तिच्यात इंजनि नव्हते, असे कंपनीच्या कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.
चार चाकी अद्याप ठोंबरेंच्याच नावे
कंपनीनेगाडी विकली असतली तरी अद्याप ती गाडी ठोंबरेंच्या नावावर आहे. त्यामुळे काही केसेस दाखल झाल्यास त्या ठोंबरेंच्याच नावावर पडणार आहेत.
मी न्यायालयात जाणार
^कंपनीनेग्राहकाच्या परवानगीशिवाय चारचाकीची परस्पर विक्री करणे कायदेशीर नाही. आमच्याकडे दंड हप्त्याचे पैसे भरल्याच्या पावत्या आहेत. कंपनीने गाडी दिली नाही तर मी न्यायालयात जाणार आहे.
सुनीताठोंबरे, चारचाकीच्या मूळ मालक