आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावकरांनाे, नवरात्राेत्सवापूर्वी घरासाेबत अापले शहर करा स्वच्छ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरात विविध भागांत साचलेले कचऱ्याचे ढीग, तुडुंब भरलेल्या कचराकुंड्यांचा कुबट दुर्गंध, कचऱ्याने साचलेल्या गटारींमुळे पावसाळ्यात गेल्या दाेन महिन्यांपासून जळगाव अाजारांच्या विळख्यात सापडले अाहे. डेंग्यू, मलेरिया, टाॅयफाॅइड अन् कावीळसारख्या अाजारांमुळे शहरातील सर्वच रुग्णालये फुल्ल भरलेली अाहेत. त्यातच परतीच्या पावसामुळे शहरातील स्वच्छतेचा अाणि अाराेग्याचा प्रश्न एेरणीवर अाला अाहे. महापालिकेची यंत्रणा सर्वच ठिकाणी पाेहोचण्यास अपयशी असल्याने अाता नागरिकांनीच शहरांचे अाराेग्य सांभाळण्यासाठी पुढाकार घेण्याची वेळ अाली अाहे. सध्या नवरात्राेत्सवानिमित्त घराघरांत साफसफाई करण्यात येत अाहे. त्यासाेबत नागरिकांनी शहर स्वच्छतेबाबत एक पाऊल पुढे टाकले तर निश्चितच नवरात्राेत्सव अाराेग्यदायी हाेईल. त्यादृष्टीने महापालिका, सामाजिक संघटना जळगावकरांनी विचार करण्याची अन् पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली अाहे.

परतीच्या पावसामुळे शहरात अस्वच्छता वाढली अाहे. तुंबलेल्या गटारी, रस्त्यावरील कचऱ्याचे ढीग अनेक अाजारांना निमंत्रण देत अाहेत. महामार्गावर दुतर्फा टाकलेला कचरा, काेर्ट चाैकासह अनेक ठिकाणी गटारी तुंबत आल्याने पाणी रस्त्यावर अाले अाहे. मेहरूण तलाव, सिंधी काॅलनी, मेहरूण गावठाण, तांबापुरा, अादर्शनगर, पिंप्राळा, जुने जळगावसह विविध भागांत पावसामुळे रस्त्याच्या कडेचा कचरा कुजला अाहे. लाख लाेकसंख्येच्या शहरात दरराेज तब्बल १२० टन कचरा रस्त्यावर येत अाहे. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या अाराेग्यावर झाला अाहे. जळगाव फर्स्टया संघटनेतर्फे रविवारी मेहरूण तलावावर स्वच्छता अभियान राबवण्यात अाले. शहरातील नागरिक, इतर सामाजिक संस्थांनीदेखील महापालिकेच्या यंत्रणेसाेबत शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घेतल्यास जळगावकरांसाठी नवरात्राेत्सव अाराेग्यदायी ठरेल.

कचऱ्याची समस्या बिकट
शहरातकचऱ्यांचे ढीग वाढता असताना परतीच्या पावसाने शहरातील कचरा व्यवस्थापन विस्कटले अाहे. महापालिकेची स्वच्छता यंत्रणा ताेडकी असून ती ठेकेदारांच्या भराेसे असल्याने कचऱ्याची समस्या जटिल झाली अाहे. कचऱ्याचे ढीग, कुजलेल्या कचऱ्यांची दुर्गंधी, डास, माश्यांचे माेहाेळ, कुत्र्यांच्या झुंडी अाणि उदरांचा सुळसुळाट, महामार्गाच्या दुतर्फा, माेकळ्या जागा, नाल्याच्या काठी कचरा फेकला जात अाहे. प्लास्टिकचा वाढता वापर, शहरीकरण, उंचावलेले राहणीमान, औद्योगिकरण यामुळे कचरा वाढला अाहे. कचऱ्याचे वर्गीकरण करता सर्वच प्रकारचा कचरा एकत्रित टाकला जात असल्याने अस्वच्छता, आजार, प्रदूषण, शहराची सौंदर्यहानी आणि पर्यावरणाचे नुकसान हाेत असून हवा, भूजल आणि माती दूषित होत अाहे.

कचरा उचलण्यासाठी सुमारे काेटी ५० हजारांचा खर्च
शहरातीलकचरा उचलण्यासाठी महिन्याला तब्बल काेटी ५० हजार रुपये खर्ची पडतात. रस्त्यावरील कचराकुंड्या, घंटागाड्यांमध्ये दरराेज १२० टन कचरा जमा हाेते. महापालिका कर्मचारी, कंत्राटी कामगार, वाहतूक यंत्रणा यांच्यावर दरराेज लाख रुपये खर्च केल्यानंतरही शहरातील संपूर्ण कचरा उचलणे शक्य हाेत नाही. नागरिकांकडून जमा हाेणारा संपूर्ण कर कचरा उचलण्यासाठी खर्च हाेत असल्याची स्थिती अाहे. नागरिकांनी स्वत:च्या घरापासून कचरा व्यवस्थापन केल्यास अाणि महापालिकेने याबाबत जनजागृती केल्यास जळगाव ‘स्वच्छ शहर’ हाेऊ शकते.

स्वच्छतेसाठी मनपाकडून असा हाेताे वार्षिक खर्च
सार्वजनिक अाराेग्यासाठी या वर्षातील तरतूद : ५९ काेटी ३४ लाख रुपये
स्वच्छता यंत्रणेतील वाहनांवरील इंधनाचा मासिक खर्च : १५ लाख
शासकीय यंत्रणेवरील मासिक खर्च : ५० लाख
ठेकेदारीच्या कामावर हाेणारा मासिक खर्च : ७५ लाख

स्वच्छतेसाठी यंत्रणा
०१ अाराेग्य अधिकारी
०४ प्र.स्वच्छतानिरीक्षक
०१ मुकादम
२५ सफाईठेकेदार संस्था
५२३ मनपाकर्मचारी
५०० कंत्राटीकर्मचारी
बातम्या आणखी आहेत...