आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योग: कर्मेसु काैशल्यम् : योगासनांनी जळगावकरांची सकाळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अांतरराष्ट्रीय याेग दिनामुळे मंगळवारी जळगावकरांची पहाट प्रसन्न अन् उत्साहवर्धक दिसली. पहाटेपासूनच चाैकाचाैकात कानाकाेपऱ्यात राष्ट्रीय सणाला जाणवते तशी लगबग सुरू हाेती. पांढऱ्याशुभ्र पेहरावात प्रत्येक जण अापल्या इप्सित ठिकाणी पाेहोचण्याची घाई करीत हाेता. शिक्षण विभागाने जाहीर केल्याप्रमाणे शहरातील सर्व शाळांत याेगशिक्षक उपस्थितांना याेगाचे धडे देत हाेते. लाखाे विद्यार्थ्यांनी याेगाचे मर्म अात्मसात करण्याचा प्रयत्न केला. या याेगयज्ञात सामाजिक संस्था, प्रशासन, युवा संघटनांचा सहभाग उल्लेखनीय हाेता. १२ हजार जळगावकरांनी याेगासनाचे धडे गिरवले.

याेग दिनानिमित्त मंगळवारी क्रीडा संकुल, पाेलिस कवायत मैदान, काव्यरत्नावली चाैक, बालगंर्धव खुले नाट्यगृह, खान्देश सेंट्रल हे पहाटेपासूनच गजबजलेले हाेते. प्रत्येक ठिकाणी अाेंकार मंत्राचा ध्वनी कानावर पडत हाेता. जमिनीवर हिरवी मॅट अच्छादण्यात अालेली हाेती. याेगमुद्रा सर्वांना दिसाव्यात यासाठी माेठे स्टेज उभारण्यात अालेले हाेते. त्यावरून लहान माेठ्या याेग शिक्षकांकडून अासनांची माहिती घेत हाेते. तासाभराचा याेगाभ्यासाने प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिवसभरासाठीची ऊर्जा जमा झाल्याची जाणीव होत हाेती. त्यातून राेज याेग करण्याचा निर्धार जाणवत हाेता.
बातम्या आणखी आहेत...