आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असुरक्षितता: तीन दिवसांत सहा ठिकाणी चोरट्यांचा धुमाकूळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव: गेल्या तीन दिवसांपासून चोरट्यांनी शहरातील विविध भागातील व्यापारी संकुल लक्ष केले असून त्यांनी अक्षरश:उच्छाद मांडला आहे. बुधवारी मध्यरात्री चोरट्यांनी बळीराम पेठेतील संगणकाचे दुकान फोडून चार मॉनेटरसह रोकड लंपास केली. त्याच रात्री आणखी दोन ठिकाणी चोरीचा प्रय} केला. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास चौबे मार्के ट परिसरात चोरट्यांनी किराणा दुकान फोडले.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील व्यापारी संकुलांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किरकोळ चोर्‍यांबरोबरच नुकसानीच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्याचबरोबर व्यापारी संकुलांची सुरक्षा वाढविण्याची मागणीही अनेक वेळा करण्यात आली आहे. तरीदेखील या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने चोरट्यांनी आपला उद्योग सुरूच ठेवला आहे.
एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी
बुधवारी मध्यरात्री शहरातील बळीराम पेठेतील गणेश प्लाझामध्ये ‘कॉम्पुटर वर्ल्ड’ या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी 26 हजार 130 रुपये किमतीचे चार कॉम्पुटरचे मॉनेटर चोरून नेले. गांधी मार्केटमध्ये असलेले महावीर ज्वेलर्स या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रय}केला.
गुरुवारीही चोरी
बुधवारपासून सुरू केलेले चोरीचे सत्र दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारीही कायम ठेवले. गुरुवारी रात्री सुरेशदादा जैन कॉम्प्लेक्सला चोरट्यांनी लक्ष केले. दुकान क्रमांक 35 मधील इंड्रस्ट्रियल बॅँक अँन्ड फायनान्स सव्र्हीसेस या दुकांनाचे शटर तोडून दोन चांदीचे शिक्के, 1 हजार रुपये रोख, 30 हजार रुपये किमतीचे एचपी कंपनीचे लायसन्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.
शुक्रवारी रात्रीही चोरी
सलग तिसर्‍या दिवशीही चोरीचा धडाका सुरूच ठेवला. शुक्रवारी रात्री तर चोरट्यांनी हद्द गाठली. साडेअकरा वाजेच्या सुमारास शहरातील अत्यत गजबजलेल्या भागातील चौबे मार्केटमधील महादेव प्रोव्हीजनचे शटर तोडून पाच-सहा हजारांची चिल्लर चोरून नेली.
पोलिस सुस्त
शहराच्या मध्यवर्ती भागात चोर्‍या होत असतांनाही सर्वच पोलिस ठाणे सुस्त दिसत आहेत. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहिल्या दिवशी म्हणजे बुधवारी चोरट्यांनी चोरी केली. तरीदेखील शहरातील गस्तीत कोणतीही वाढ दिसून आली नाही. गुरुवारी चोरांनी आपला मोर्चा एमआयडीसी भागाकडे वळविला. तरीदेखील पोलिस मात्र सुस्तच दिसून आले. शुक्रवारी चोरट्यांनी शनिपेठ भागात धुमाकूळ घातला. तरीही पोलिस सुस्त दिसले.