आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन नोंदणीमुळे जळगाव स्वयंरोजगार कार्यालय पडले ओस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- रोजगार व स्वयंरोजगार नोंदणी ऑनलाइन करण्यात आल्यामुळे शहरातील स्वयंरोजगार कार्यालय अक्षरश: ओस पडले आहे.

दहावी व बारावीचे निकाल लागताच रोजगार आणि स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडत होती. तसेच उमेदवारांची गर्दी वाढल्यामुळे अनेकदा कार्यालयात पोलिस बंदोबस्तही ठेवावा लागत होता; मात्र आता उमेदवार कार्यालयाकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे.

नोकरी करू इच्छिणार्‍या उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नावनोंदणी, नूतनीकरण, शैक्षणिक पात्रतेतील वाढ, नोंदणीचे स्थलांतर व पत्त्यातील बदल आदी सेवा मोफत पुरवल्या जातात. त्यासाठी कार्यालयात अथवा तालुकास्तरावरील फिरत्या पथकासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून नोंदणी करावी लागत असे; परंतु त्यामुळे उमेदवारांना आर्थिक फटका बसण्यासह बराच वेळही वाया घालवावा लागत असे. तसेच साधारणत: दोन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन नोंदणी पद्धतीत नावनोंदणी केल्यानंतर तात्पुरता क्रमांक प्राप्त होत असे. त्यानंतर कायमस्वरूपी नोंदणीपत्र ‘क्ष-10’ प्राप्त करण्यासाठी उमेदवाराला पुन्हा कार्यालयात जावे लागत होते; मात्र आता ही पद्धत पूर्णपणे बदलली आहे.


काय आहे सूचना
http/www.maharojgar.gov.in ही वेबसाइट सुरू झाली आहे. कृपया आपण स्वत: नवीन नोंदणी/शैक्षणिक वाढ/पात्रता वाढ/
नूतनीकरण/ पत्ता बदल ही कामे घरीबसल्या करू शकतात.

कर्मचारी उदासीन
कार्यालयाच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या नोंदणीव्यतिरिक्त इतर सेवांचा लाभ घेण्यास कोणीही कार्यालयात येत नाही. या कार्यालयात ग्रंथालयाचीही सुविधा आहे; मात्र पुस्तके वाचण्यासाठी कुणीही येत नाही. जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात तीन महिन्यांपूर्वी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने उमेदवार उपस्थित राहिले होते; मात्र त्यानंतर कार्यालय पुन्हा ओस पडले आहे.

सेवांचे विकेंद्रीकरण
रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या सेवांचे 3 जानेवारी 2013 रोजी विकेंद्रीकरण करण्यात आले आहे. यापुढे उमेदवारांना सर्व सेवा महा-ई सेवा केंद्र, शासकीय आयटीआय, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग कॉलेज आदींमधून ऑनलाइन पद्धतीने सशुल्क उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच उद्योजकांची नोंदणी, तिमाही विवरणपत्र, ईआर-1 व द्विवार्षिक विवरणपत्र ईआर-2 ऑनलाइन पद्धतीने फाइल करण्याच्या सशुल्क सुविधाही उपलब्ध आहेत.

3,535 विद्यार्थ्यांची जानेवारी ते जून 13पर्यंत नोंदणी
1,03,514 विद्यार्थ्यांची जून 2013पर्यंत एकूण नोंदणी

ऑनलाइन सुविधेमुळे विद्यार्थी कार्यालयात येत नाही
ऑनलाइन सुविधेमुळे आता विद्यार्थी कार्यालयात येत नाहीत. तथापि, सध्या महा ई-सेवा केंद्राच्या अभियानासाठी शासनाने सर्व कर्मचार्‍यांना विविध तालुक्यांत सर्वेक्षण करण्याचे काम दिले आहे.
- प्रकाश सोनवणे, सहायक संचालक