आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव रोटरी क्लब १७ अवॉर्डने सन्मानित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- रोटरी क्लबच्या जळगाव शाखेस २०१४-२०१५ या वर्षात केलेल्या विविध कामगिरीसाठी ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३०’च्या विविध प्रकारच्या १७ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
रोटरीतर्फे सन २०१४-१५ या वर्षात जयपूर फूट प्रोजेक्ट, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप यासह माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे डोळे, दंत स्किन तपासणे, रेल्वे माल धक्क्यावरील हमाल सबजेलमधील कैदी यांची वैद्यकीय तपासणी करणे, माल धक्क्यावर पाण्याची टाकी उभारणे, जिल्हा रुग्णालयात कुपोषित बालकांसाठी आर.ओ सिस्टिम, मिक्सर, खेळणी देणे, एम.जे. कॉलेजमधील १५ विद्यार्थ्यांची शैक्षणिक जबाबदारी, ५४ स्त्रियांसाठी साक्षरता प्रकल्प, डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स घेणे आदी उपक्रम घेण्यात आले आहेत. रोटरीच्या अध्यक्षा डॉ.मंगला जंगले, सेक्रेटरी डॉ.तुषार फिरके यांच्या कार्यकाळात ही कामे झाली आहेत.
वर्षभर झालेल्या कार्यक्रमांसाठी रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३०३० कडून अवॉर्ड्स दिले जातात. यावर्षी १४ जूनला नाशिक येथील गुप्ता गार्डन्समध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात जळगाव शाखेला १७ पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
बिल्डर अवॉर्ड अन‌् बेस्ट वर्क डन फॉर पोलिओ
रोटरीला क्लब बिल्डर अवॉर्ड, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्पेशल सायटेशन, असिस्टंट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, बेस्ट प्रेसिडेंट, क्लब बिल्डर अवॉर्ड, केअर ऑफ आइज, बेस्ट वर्क डन फॉर पोलिओ, बेस्ट रिपोर्टिंग यासह विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...