आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटरी क्लब ऑफ जळगावचा एक हजार मोतीबिंदू शस्त्रक्रियांचा संकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - रोटरी क्लब ऑफ जळगाव आणि नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) तर्फे येत्या वर्षभरात एक हजार रुग्णांच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प नुकताच करण्यात आला. संकल्पानुसार आतापर्यंत 30 रुग्णांवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली आहे.

जुलै महिन्यातच रोटरी क्लबच्या नूतन कार्यकारिणीची निवड झाली होती. अध्यक्षपदी डॉ.सतीश शिंदाडकर तर सचिवपदी राजेश वेद यांची निवड झाली. नूतन कार्यकारिणी सदस्यांनी वर्षभरात समाजोयोगी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचा निर्णय रोटरीच्या सदस्यांनी घेतला. ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदूचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याने रोटरीच्या सर्व सदस्यांनी उपक्रमाला मान्यता दिली. येत्या वर्षभराच्या कालावधीत एक हजार रुग्णांवर मोतिबिंदूची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. रविवारी शहरात रोटरीतर्फे नेत्रतपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरासाठी राजेश वेद, आसिफ मेमन, डॉ.ओम भावसार, उदय पोतदार, राकेश चव्हाण, जितेंद्र ढाके, योगेश गांधी, शांती दमाणी यांनी सहकार्य केले.

30 रुग्णांवर झाली शस्त्रक्रिया

या उपक्रमास जुलै महिन्यात सुरूवात झाली आहे. पहिल्याच महिन्यात दोन नेत्रतपासणी शिबिरे घेण्यात आली. शिबिरातील तपासणीनंतर 85 रुग्णांवर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे आढळले. त्यापैकी पहिल्या टप्प्यात नंदुरबार येथील कांतालक्ष्मी शहा नेत्र रुग्णालयात 30 रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. उर्बरित 55 रुग्णांवर 31 जुलैला शस्त्रक्रिया होणार आहे.

हे डॉक्टर्स देताहेत मोफत सेवा

डॉ.सारंग फालक, डॉ.सुनील मेश्राम, डॉ.विकास चौधरी, डॉ.उदय चौधरी, डॉ.अशोक रावेरकर, डॉ.माधुरी कासट, डॉ.सुदाम रामचंदानी, डॉ.राहुल पाटील, डॉ.योगेंद्र कासट, डॉ.नितीन वाणी, डॉ.कांतीलाल नारखेडे, डॉ.सोनाली नारखेडे.

संपूर्ण प्रक्रिया मोफत
उपक्रमांतर्गत शिबिरात नोंदणी करणार्या रुग्णांच्या तपासणी पासून ते शस्त्रक्रियेनंतरचा औषधोपचार आणि तपासण्या मोफ त केल्या जातात. शस्त्रक्रियेसाठी नंदुरबार, पुणे येथील प्रवास, निवास तसेच भोजनाचा खर्चही रोटरी क्लबतर्फेच केला जातो.

आणखी उपक्रम राबवणार
मोतीबिंदूचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिकांना होतो. त्यामुळे शस्त्रक्रियेचा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. आत्तापर्यंत शिबिरात नोंदणी झालेल्या रुग्णांपैकी 90 टक्के रुग्ण 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. येत्या काळात आणखी काही समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस आहे. डॉ.सतीश शिंदाडकर, अध्यक्ष, रोटरी क्लब ऑफ जळगाव