आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेम करायला हरकत नाही; पण संस्कृतीचेही भान ठेवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- प्रेम करायला काहीही हरकत नाही. तसेच प्रेम करणे पापही नाही; पण आपल्या संस्कृतीचेही भान ठेवले पाहिजे, असा सूर येथील रोटरी भवनात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करावा की नाही?’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात निघाला.

रोटरी क्लब ऑफ वेस्ट आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ आयएनआयएफडीतर्फे गुरुवारी चर्चासत्र झाले. त्यात सहा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. उपस्थित विद्यार्थ्यांमधून दोन जणांनी ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यावर आक्षेप घेतला, तर इतर चौघांनी त्याच्या सर्मथनार्थ आपले मत मांडले. या वेळी रोटरी क्लब ऑफ वेस्टचे अध्यक्ष अनिल कांकरिया, मानद सचिव अनंत भोळे, नितीन रेदासनी, आयएनआयएफडीच्या संगीता पाटील उपस्थित होत्या. सूत्रसंचालन गनी मेमन यांनी केले.


काय वाटते तरुणाईला?
‘व्हॅलेंटाइन डे’ हा आई-वडील, भावंडे, पाळीव प्राणी यांच्याप्रती असलेले प्रेम व्यक्त करण्यासाठीही साजरा करतात.
-मल्हार जाधव

14 फेब्रुवारीला शहीद भगतसिंग, सुकदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली होती. त्यामुळे या दिवशी भारतात दु:ख व्यक्त केले गेले पाहिजे; मात्र युवक या दिवसाला ‘प्रेमाचा दिवस’ म्हणून साजरा करतात, हे चुकीचे आहे.
-काजल पाटील


केवळ प्रेमच नव्हे, तर एकमेकांकडून झालेल्या चुका माफ करण्याचाही हा दिवस आहे. संपूर्ण महिना प्रेमाचा असल्यामुळे तो साजरा करण्यास काही वावगे नाही. -
मोहन सोनी

हा दिवस मित्र-मैत्रिणीही एकत्र येऊन साजरा करतात. त्यामुळे त्यांच्या वर्तणुकीबाबत संशय व्यक्त करणे चुकीचे आहे.
-भावना जाधवाणी


मोठी मंडळी करतात तसे करण्याची इच्छा लहानांना होते. त्यामुळे आपण पाश्चिमात्य संस्कृतीतील सण साजरे न करता भारतीय संस्कृती जोपासली पाहिजे.
-कृष्णा बोरा

भारतात होळी, दिवाळी आदी सर्व सण साजरे केले जातात. या सणांमधूनही प्रेम आणि आनंद व्यक्त केला जातो. मग ‘व्हॅलेंटाइन डे’लाच विरोध का केला जातो?
-नेहा कुकरेजा