आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशासनातील वाळूमाफिया शोधण्याचे आव्हान !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाळूमाफियांच्या हल्ल्यामुळे जागे झालेल्या प्रशासनापुढे यंत्रणेतीलच वाळूमाफियांना आवर घालण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. तहसीलदारांनी पडकलेल्या ट्रॅक्टरच्या मालकीबाबत तलाठय़ावर संशय असताना आता वाळूमाफिया पोलिसांची वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. चालक आणि मालक उपलब्ध नसले तरी ती वाहने शासकीय सेवेतील माफियांची असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पुरावे नसल्याने प्रशासन हतबल झाल्याची स्थिती आहे. महसूल आणि पोलिसातील माफियांचा शोध घेण्याचे आव्हान जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांपुढे आहे.
पकडलेले डंपर तलाठी सत्यजित नेमाने यांचे असल्याचा संशय आल्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी यंत्रणेतील माफियांचा शोध घेण्यासाठी स्वत: मोहीम उघडली आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी थेट गिरणा नदीचे पात्र गाठले. रात्री 11 ते 2.30 वाजेपर्यंत पात्रात पायी फिरून त्यांनी पाहणी केली. पोलिसदेखील वाळूच्या धंद्यात भागीदार असल्याने त्यांच्या शोधासाठी पोलिस अधीक्षकांची त्यांना मदत घ्यावी लागणार आहे. वाळूसाठी नेमण्यात आलेल्या पथकाला त्यांनी सूचना दिल्या आहेत. पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांच्या हालचालींची, कारवाईची माहिती कार्यालयातून दिली जात असल्याचा संशयही आता व्यक्त केला जात आहे.
तहसीलदार देणार अहवाल
गुरुवारी रात्री पकडण्यात आलेले डंपर हे तलाठी सत्यजित नेमाने यांचे आहे का? त्यांची यात भागीदारी आहे? यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी तहसीलदारांना दिले आहे.