आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रेंड: सुवर्ण खरेदीत 25 टक्के वाटा पुरुषांचा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव- सुवर्णलंकाराच्या झळाळीत महिलांप्रमाणे पुरुषांचाही कल दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षात सोने खरेदीत पुरुषांचा वाटा 25 टक्क्यांवर गेला असून त्यात युवकांचे प्रमाण अधिक आहे. एकीकडे सोन्याचे भाव गगनाला भिडले असतानाही सोन्याची खरेदी तसूभर कमी झालेली नाही.

सुवर्णालंकार म्हणजे महिलांचा विक पॉइण्ट! पण पुरुष मंडळीही याबाबतीत काही मागे नाहीत हे अलीकडे वाढलेल्या खरेदीवरून दिसून येते. सराफांच्या म्हणण्यानुसार 25 टक्के पुरुष त्यांच्या स्वत:साठी विविध प्रकारच्या दागिन्यांची खरेदी करतात. स्टेटस सिम्बॉल बरोबरच एक चांगली गुंतवणूक म्हणून सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करण्यात येते. मात्र, पुरुषांमध्ये या कारणांसह त्यांच्या व्यवसायाचे प्रतिबिंब दिसून येते. सोन्याप्रमाणे हिरे आणि विविध रंगी खड्यांच्या दागिन्यांचा वापर पुरुष मंडळी करतात. कंबरेची चेन व प्लॅटिनमलाही ते अधिक पसंती देतात याशिवाय गर्भर्शीमंतात सोन्याचे घड्याळ, सोन्याचे चष्म्यांनाही चांगली मागणी असते, असे सुवर्णकारांनी सांगितले.

युवावर्गात वाढता प्रतिसाद : चार-पाच वर्षांपूर्वी सोने खरेदीत पुरुषांचा वाटा आठ ते दहा टक्के होता. तो आज सुमारे 25 टक्क्यांपर्यंत गेला आहे. यात युवावर्गाचे 10 ते 13 टक्के, प्रौढ वर्ग 7 ते 10 टक्के आणि ज्येष्ठांचे साधारणत: 3 ते 5 टक्के प्रमाण आहे. युवावर्गाच्या वाढत्या प्रतिसादामुळे भविष्यात सोने खरेदी टक्केवारीत वाढ होण्याची शक्यता आहे.

विविध गटांची वेगळी आवड
आजही पुरुष दागिने वापरतात. मात्र, त्यांच्या दागिन्यांच्या नक्षीकामात फारसा बदल होत नाही. अत्यंत साधे व कमी जास्त सोने असलेल्या दागिन्यांचा समावेश यामध्ये आहे. महिलांच्या दागिन्यांच्या खरेदीचे प्रमाण 60 तर 25 टक्के पुरुषांच्या दागिन्याची खरेदी केली जाते. सुशीलकुमार बाफना, संचालक, आरसी ज्वेलर्स.

नोकरदार
नोकरदार वर्गामध्ये मध्यम आकाराच्या चेन, ब्रेसलेट आणि अंगठी वापरण्याचा ट्रेंड आहे.

राजकीय
राजकारणात वावरणार्‍या व्यक्ती जाडसर चेन, ब्रेसलेटचा वापर करतात.

युवक
महाविद्यालयीन तरुणांमध्ये कानातील बाळी आणि ब्रेसलेट यांचा वापर स्टाइल म्हणून केला जातो.